Mohit Sharma IPL 2024 : मोहित शर्मा 35 व्या वर्षी ठोठावतोय टीम इंडियाचं दार... अजित आगरकर देणार प्रतिसाद?

Mohit Sharma
Mohit Sharma esakal

Mohit Sharma IPL 2024 T20 World Cup Team India Squad : आयपीएल हंगामातील जवळपास 12 सामने झाले असून गुजरात टायटन्सचा एक खेळाडूने आपल्या कामगिरीत कमालीचं सातत्य ठेवलं आहे. आयपीएलच्या कामगिरीवर भारताचा टी 20 संघ निवडला जाणार आहे.

आजच्या गुजरात विरूद्ध हैदराबादच्या सामन्यात अशाच एका गोलंदाजानं दमदार कामगिरी करत निवडसमितीचे लक्ष आपल्याकडे वेधले आहेत. मोहित शर्माने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलं आहे.

Mohit Sharma
IPL 2024 GT vs SRH : गुजरात टायटन्सने हैदराबादला दिला 7 विकेट्सनी पराभवाचा धक्का

गेल्या हंगामाप्रमाणेच यंदाच्या हंगामात देखील मोहित शर्माने गुजरातसाठी डेथ ओव्हरमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने हैदराबादविरूद्धच्या सामन्यात 4 षटकात 25 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची स्मार्ट गोलंदाजी पाहून तो टीम इंडियात आपली दावेदारी सादर करत आहे.

मोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलच्या 17 व्या हंगामात 3 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 6 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने फक्त 7.75 च्या सरासरीने धावा देत सर्वांना आश्चर्यचकीत केलं. त्याने 12 षटकात फक्त 93 धावा दिल्या आहेत. त्याने 2023 च्या हंगामात 14 सामन्यात 27 विकेट्स घेतल्या होत्या. तो हंगामातील दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.

मोहित का आहे महत्वाचा?

भारतीय टी 20 वर्ल्डकप संघाच्या निवडीसंदर्भात बोलायचं झालं तर मोहित शर्मा हा संघात फिट बसू शकतो. एखादा गोलंदाज जो 130-135 kmph वेगाने गोलंदाजी करतोय आणि स्लोअर गोलंदाजीचं उत्तम मिश्रण करण्यात यशस्वी होत असेल तर असा गोलंदाज अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथे होणाऱ्या वर्ल्डकपसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मोहित शर्मा डेथ ओव्हरमध्ये एक चांगला गोलंदाज ठरू शकतो.

Mohit Sharma
IPL 2024, DC vs CSK: ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नई का साधू शकते विजयाची हॅट्ट्रिक? ही आहेत कारणे

अमेरिकेत ड्रॉप इन पिचेस असणार आहेत. तेथील खेळपट्टी सहसा संथ आणि कमी उसळी घेणारी असते. ही परिस्थिती मोहित शर्मासाठी उपयुक्त ठरू शकते. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली म्हणजे जगतील अनेक चांगल्या खेळाडूंविरूद्ध खेळण्याचा आत्मविश्वास कमावणे. अशा परिस्थितीत मोहित संघात येऊ शकतो. तो वर्ल्डकप संघात असेल किंवा नसेल हे येणारा काळच ठरवेल.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com