
Hardik Pandya On Impact Player Rule: आयपीएलमध्ये इम्पॅक्ट खेळाडू या नियम बराच चर्चेत राहिलेला आहे. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व संपल्याची टीका केली जात आहे, परंतु माझ्यासारख्या परिपूर्ण, अष्टपैलू खेळाडूंचेच महत्त्व कायम असल्याचे हार्दिक पंड्याने सांगितले.
सलग तिसऱ्या वर्षी इम्पॅक्ट खेळाडूचा हा नियम कायम रहाणार आहे. त्यावर अनुकुल-प्रतिकूल अशी अनेक मतमतांतर व्यक्त करण्यात आलेली आहे. संघाला गरज लागते तेव्हा एक तर फलंदाज किंवा गोलंदाजाला राखीव खेळाडू म्हणून खेळवण्यात येते. परिणामी, अष्टपैलू खेळाडूंचे अंतिम ११ खेळाडूंमधील स्थान कमी झालेले आहे, परंतु असा खेळाडू जो फलंदाज म्हणूनही आणि गोलंदाज म्हणूनही सामना जिंकून देऊ शकतो, अशा परिपूर्ण अष्टपैलू खेळाडूचे महत्त्व कायम असल्याचे हार्दिक म्हणाला.