Hardik Pandya : पांड्याची पॉवर होतीय कमी? वानखेडे सोडलं तर ठरतोय फेल, माजी खेळाडूने व्यक्त केली चिंता

Irfan Pathan on Hardik Pandya : जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ज कपसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. वृत्तानुसार भारतीय कर्णधार रोहित शर्माही निवडकर्त्यांसोबत दिल्लीत बसणार आहे.
Irfan Pathan on Hardik Pandya News Marathi
Irfan Pathan on Hardik Pandya News Marathisakal

Irfan Pathan on Hardik Pandya : जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ज कपसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. वृत्तानुसार भारतीय कर्णधार रोहित शर्माही निवडकर्त्यांसोबत दिल्लीत बसणार आहे. पण, हे होण्याआधीच इरफान पठाणने मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. आणि हार्दिक पांड्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्याची चिंता हार्दिक पांड्याच्या सध्याच्या फॉर्मबद्दल आहे.

Irfan Pathan on Hardik Pandya News Marathi
Sunil Narine : 'मी वर्ल्डकप खेळणार नाही...' IPL मध्ये तांडव घालणाऱ्या खेळाडूच्या पोस्टने क्रिकेट विश्वात उडाली खळबळ

भारताचा महान अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने त्याच्या एक्स-हँडलवर हार्दिक पांड्याबद्दल एक पोस्ट केली. तो म्हणाला की, हार्दिक पांड्याच्या फलंदाजीत पॉवर कमी होतीय. जेव्हा हार्दिक वानखेडेवर खेळतो तेव्हा तो वेगळा असतो. पण, ज्या खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना पाठिंबा मिळतो, तिथे हार्दिक संघर्ष करताना दिसतो, ही चिंतेची बाब आहे.

Irfan Pathan on Hardik Pandya News Marathi
IPL 2024 Playoffs Scenario : राजस्थानच्या विजयानंतर प्लेऑफच्या शर्यतीत उरल्या फक्त 6 टीम, 4 संघांच्या गाडीला लागला ब्रेक?

हार्दिक पांड्याने आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळल्या गेलेल्या पहिल्या 8 सामन्यांमध्ये केवळ 151 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 39 धावा आहे. म्हणजे एकही पन्नास प्लस स्कोअर नाही.

आठ सामन्यात पांड्याच्या बॅटमधून फक्त 7 षटकार दिसले आहेत. यातील सर्वाधिक षटकार त्याने वानखेडेवरच मारले आहेत. पंड्याचा या हंगामात आतापर्यंतचा फलंदाजीचा स्ट्राइक रेट 142.45 आहे.

जर आपण पांड्याच्या गोलंदाजीबद्दल बोललो, तर त्याने आयपीएल 2024 च्या पहिल्या 8 सामन्यांमध्ये केवळ 4 विकेट घेतल्या आहेत, तेही 46.50 च्या महागड्या सरासरीने आणि 10.94 च्या उच्च इकॉनॉमी रेटने.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com