Hardik Pandya | 'हार्दिक पांड्या हे नाव कायम विकलं जातं'

Hardik Pandya
Hardik Pandya esakal

कोलकाता : हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हे नाव जवळपास एक - दीड महिन्यापूर्वी एका साशंकतेच्या गर्तेत अडकलं होतं. मात्र आयपीएलचा फिव्हर जसजसा चढू लागला तसतसे हार्दिक पांड्या हे नाव विजयाची हमी देऊन जाऊ लागलं. हार्दिक पांड्याने बऱ्याच काळानंतर भारतीय संघात पुनरागमन केले. आता त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आयपीएलच्या (IPL 2022) पहिल्याच हंगामात फायनल गाठली. दरम्यान, राजस्थानला मात दिल्यानंतर हार्दिक पांड्याने पत्रकार परिषद घेतली. या पत्राक परिषदेत तो आपल्या बाबत होणाऱ्या टीका, चर्चांना उत्तर देताना म्हणाला की, 'लोकं तर बोलणारच कारण त्यांच ते काम आहे यात मी काही करू शकत नाही.'

Hardik Pandya
मिलरच्या ट्वीटवर राजस्थानचे उत्तर," दुश्मन ना करे दोस्त ने ..."

पांड्या पुढे म्हणाला, 'हार्दिक पांड्याचं नाव हे कायम विकलं जातं याबाबत मला कोणतीही अडचण नाही. मी हसून याला सामोरे जातो.' मुंबई इंडियन्समध्ये संधी मिळाल्यानंतर हार्दिक पांड्याचे नशिब उघडले होते. त्याने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ज्यावेळी तो भरात होता त्यावेळी त्याची तुलना भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्याशी केली जाते. मात्र 2019 मध्ये कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने तो बॅड बॉय बनला होता. त्याला निलंबनाची कारवाई देखील सहन करावी लागली होती. त्यानंतर त्याच्या पाठीच्या दुखण्याने उचल खाली आणि त्याच्या गोलंदाजीवर मर्यादा आली. त्याला आपल्या संघातील स्थान देखील गमवावे लागले.

Hardik Pandya
चहलने गुजरातला दिली इन्स्टा हॅक करण्याची धमकी! - VIDEO

हार्दिक पांड्याने शेवटचा सामना आठ नोव्हेंबरला दुबईत झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळला होता. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यापासून त्याला गोलंदाजी करताना अडचण निर्माण झाली आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्समधून त्याला रिलीज केल्यानंतर आयपीएलचा नवा संघ गुजरात टायटन्सने त्याला 15 कोटी रूपयांना खरेदी केले. गुजरातने त्याला थेट कर्णधार केले. यावरही सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. पांड्याला कॅप्टन्सीचा कोणताच अनुभव नव्हता. मात्र त्याने आपल्या संघाला पहिल्याच हंगामात फायनलपर्यंत पोहचवले. पांड्या आपल्या कॅप्टन्सीबाबत म्हणतो की, तो त्याचा मेंटॉर एमएस धोनी सारखा आहे. तो म्हणतो त्या प्रमाणेच त्याने टीकाकारांना आपल्या कामगिरीने प्रत्युत्तर दिले. पांड्या म्हणतो की, 'माही भाईने माझ्या आयुष्यात मोठी भुमिका बजवली आहे. तो माझ्यासाठी भावासारखा आहे, मित्र आणि कुटुंबासारखा आहे. मी त्याच्याकडून काही चांगल्या गोष्टी शिकल्या आहेत. वैयक्तिकरित्या मी कणखर होऊनच या सर्व गोष्टींचा सामना करू शकलो.'

Hardik Pandya
मालदीवमध्ये रोहित पत्नी रितीकासोबत दिसला रोमँटिक मूडमध्ये - पाहा Photo

हार्दिक पांड्याने यंदाच्या हंगामात 45 पेक्षाही जास्त सरासरी राखत 453 धावा केल्या. त्याचे स्ट्राईक रेट हे 132.84 इतके आहे. याचबरोबर त्याने 7.73 च्या सरासरीने पाच विकेट देखील घेतल्या. हार्दिक पांड्या म्हणाला, 'कर्णधार होण्यापूर्वी देखील मी शांत राहत होतो. अशा प्रकारेच तुम्ही चांगला निर्णय घेऊ शकता. मी माझ्या कारकिर्दित आणि आयुष्यात देखील विचलीत होण्यापेक्षा 10 सेकंद थांबण्याला प्राधान्य देतो.' रविवारची फायनल त्याचे होम ग्राऊंड मोटेरा स्ट्रेडियमवर होणार आहे. पांड्याला याबाबत विचारले असता त्याने 'हे जबरदस्त आहे. ते खूप मोठे मैदान आहे. ते आमचे होम ग्राऊंड आहे. आमचं राज्य. मला आशा आहे की स्टेडियम पूर्णपणे भरलेले असेल.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com