चहलने गुजरातला दिली इन्स्टा हॅक करण्याची धमकी! - VIDEO | Yuzvendra Chahal GT Social Media Hacked | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yuzvendra Chahal Gujarat Titans Social Media Hacked

चहलने गुजरातला दिली इन्स्टा हॅक करण्याची धमकी! - VIDEO

युजवेंद्र चहल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याची कोणती पण पोस्ट केलेला फोटो चांगलीच व्हायरल होते. सतत सक्रिय असल्यामुळे त्याला सोशल मीडियाचा राजा मानले जाते. गुजरात टाइंट्सचे सोशल मीडिया पाहणाऱ्या अॅडमिनला चहलने धमकी दिली आहे. (Yuzvendra Chahal Gujarat Titans Social Media Hacked)

हेही वाचा: मालदीवमध्ये रोहित पत्नी रितीकासोबत दिसला रोमँटिक मूडमध्ये - पाहा Photo

राजस्थानच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये चहल गुजरात टायटन्सच्या अॅडमिनला त्याचे काही फोटो पाठव असं बोलत आहे. अनुभवी फिरकी गोलंदाज राशिद खानसोबत चहल फोटोसाठी पोज देत व्हिडिओमध्ये उभा दिसत आहे. त्यादरम्यान चहल म्हणाला की, मी तुमच्या इन्स्टा वर किती मेसेज केले आहे. माझा फोटो कुठे आहे. आजपर्यंत मला एकही रिप्लाय आलेला नाही. मी तुमच इन्स्टा हॅक करेन, माझ्या बरोबर सोशल मीडियावर पंगा घेऊ नका.

हेही वाचा: गुजरातचा मिलर ट्विट करत राजस्थानला म्हणाला, 'सॉरी'; काय आहे कारण?

चहलच्या बोलण्यावर राशिदही हसायला लागला. गुजरातसोबतच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थानला ७ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह गुजरातने आयपीएलच्या अंतिम फेरी प्रवेश केला. दुसरीकडे राजस्थान आता क्वालिफायर 2 मध्ये एलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या संघाशी भिडणार आहे. क्वालिफायर 2 सामना जिंकणारा संघ फायनल मध्ये गुजरातशी २९ मे रोजी मैदानात उतरणार आहे.

Web Title: Yuzvendra Chahal Gujarat Titans Social Media Hacked Rashid Khan Not Believe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top