BIG NEWS WHO WILL LEAD MUMBAI INDIANS 1st MATCH IPL 2025?
मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पहिल्या सामन्यात नव्या कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली खेळावे लागणार आहे. मुंबई इंडियन्स IPL 2025 मध्ये पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सला चेपॉकवर भिडणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार नाही. आयपीएलच्या मागील पर्वात हार्दिकवर वेळेत षटक पूर्ण न केल्याची चूक दोन वेळा केल्यामुळे कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार त्याच्यावर एका सामन्याची बंदी आहे आणि त्यामुळेच तो MI Vs CSK लढतीत खेळणार नाही.