कहीं खुशी कहीं गम! हार्दिकची नताशा हिरमुसली तर रोहितच्या रितिकाची कळी खुलली... | Natasa Stankovic Ritika Sajdeh Reaction | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Natasa Stankovic Ritika Sajdeh Reaction

कहीं खुशी कहीं गम! हार्दिकची नताशा हिरमुसली तर रोहितच्या रितिकाची कळी खुलली...

आयपीएल मधील आतापर्यंतचा सर्वात रोमांचक असा सामना शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. प्वॉइंट्स टेबल मध्ये अव्वल असलेल्या गुजरात टायटन्सला विजयासाठी शेवटच्या षटकात नऊ धावांची गरज होती, पण मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने ते करून दिले नाहीत. मुंबई इंडियन्सने हा सामना पाच धावांनी जिंकला. मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असलं, तरी हा विजय त्यांच्यासाठी किती खास होता, याचा अंदाज रोहित शर्माच्या सेलिब्रेशनवरून लावता येईल.(Natasa Stankovic Ritika Sajdeh Reaction)

मैदानावर रोहितच नव्हे तर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या खेळाडूंच्या पत्नींनीही या विजयाचा आनंद लुटताना दिसत होत्या. दुसरीकडे गुजरात टायटन्सच्या खेळाडूंच्या पत्नींचा पराभवावर विश्वास बसत नव्हता. त्यात हार्दिक पंड्याची पत्नी नताशा आणि रोहित शर्माची पत्नी रितिका यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Rohit Sharma | गुजरातची शतकी सलामी तरी मुंबईने चारली पराभवाची धूळ

हंगामात गुजरात टायटन्सने सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना खराब सुरवात केले तरी अनेक सामनेही जिंकले आहेत, त्यामुळे गुजरात टायटन्सचा संघ विजयासाठी आवश्यक नऊ धावा करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. या विजयानंतरही मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे, तर गुजरात टायटन्स अव्वल स्थानावर आहे. सलग आठ पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा विजय आहे, तर गुजरात टायटन्स संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.

Web Title: Hardik Pandya Wife Natasa Stankovic Rohit Sharma Wife Ritika Reaction Gt Vs Mi Match Ipl 2022 Watch Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top