
Rohit Sharma | गुजरातची शतकी सलामी तरी मुंबईने चारली पराभवाची धूळ
मुंबई : अटीतटीच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपला खेळ उंचावला. गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) शेवटच्या षटकात 9 धावांची गरज असताना डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) फक्त 3 धावा देत मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईने गुजरासमोर 178 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र गुजरातला 20 षटकात 5 बाद 172 धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातकडून वृद्धीमान साहाने सर्वाधिक 55 धावा केल्या. त्याला शुभमन गिलने 52 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी 106 धावांची सलामी दिली. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी खेळ उंचवला आणि सामना जिंकून दिला. मुंबईकडून मुर्गन अश्विनने दोन तर पोलार्डने 1 विकेट घेतली. मुंबईकडून इशान किशनने 45, रोहित शर्माने 43 तर टीम डेव्हिडने नाबाद 44 धावा केल्या.
हेही वाचा: खेळाडूंना उसंत नाही! भारताचा विंडीज दौरा झाला फिक्स, अमेरिकेतही सामने?
मुंबईचे 178 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सने दमदार सुरूवात केली. सलामीवीर शुभमन गिल आणि वृद्धीमान साहाने पॉवर प्लेमध्ये नाबाद 54 धावा केल्या. पॉवर प्लेनंतर शुभमन गिलने देखील आपला गिअर बदलला. या दोघांनी शतकी भागीदारी रचत आपापली अर्धशतकेही पूर्ण केली.
मात्र 106 धावांची सलामी देणारी दोडी मुर्गन अश्विनने फोडली. त्याने 13 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 52 धावांवर शुभमन गिलला बाद केले तर 6 व्या चेंडूवर 55 धावा करणाऱ्या वृद्धीमान साहाला बाद करत दुसरा सलामीवीर देखील माघारी धाडला. त्यानंतर पोलार्डने साई सुदर्शनला 14 धावांवर केले बाद करत गुजरातला तिसरा धक्का दिला. दरम्यान, डेव्हिड मिलरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत सामना 6 चेंडूत 9 धावा असा आणला. शेवटचे षटक टाकणाऱ्या डॅनियल सॅम्सने टिच्चून मारा करत गुजरातला चांगलेच आवळले. दरम्यान, राहुल तेवतिया देखील 2 धावांवर धावबाद झाला. सामना 1 चेंडू आणि 6 धावा असा आला. स्ट्राईकवर मिलर होता. मात्र मिलरलाही काही करता आले नाही. अखेर मुंबईने सामना 5 धावांनी जिंकला.
हेही वाचा: VIDEO : रोहितचा एका षटकाराने मिळाले एक शिंगी गेंड्यांना पाच लाख रूपये
या धक्यातून कर्णधार हार्दिक पांड्याने गुजरातला सावरले. मात्र 14 चेंडूत 24 धावा करणाऱ्या पांड्याला इशान किशनने मोक्याच्यावेळी धावाबाद केले. पांड्या बाद झाला त्यावेळी गुजरातला 14 चेंडूत 22 धावांची गरज होती.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गुजरातने प्रथम मुंबईला फलंदाजीला पाचारण केले. मुंबईने गुजरात टायटन्ससमोर 177 धावांचे आव्हान ठेवले. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. रोहित शर्माने देखील आक्रमक सुरूवात करत 43 धावांची खेळी केली. तर टीम डेव्हिडने देखील तिलर वर्मासोबत भागीदारी रचत मुंबईला 150 च्या पार पोहचवले. त्याने 21 चेंडूत नाबाद 44 धावांची खेळी केली. यामुळे मुंबईला 177 धावांपर्यंत मजल मारता आली. गुजरातकडून राशिद खानने 2 तर अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी 1 विकेट घेतली
Web Title: Mumbai Indians Defeat Gujarat Titans In Last Ball Thriller Match Ipl 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..