IPL 2024 Virat Kohli : विराटच्या एका कृतीने हार्दिकचा विरोध मावळला

मुंबईचा राजा रोहित शर्मा... विराट कोहलीही प्रेक्षकांचा लाडका... अन् हार्दिकला होणारा विरोध त्वरित मावळला... वानखेडे स्टेडियमवरचे हे गुरुवारचे चित्र मुंबई इंडियन्स या आपल्या संघाने मिळवलेल्या विजयाएवढेच हार्दिक पंड्यासाठी आनंददायी ठरले.
IPL 2024 Virat Kohli
IPL 2024 Virat Kohlisakal

मुंबई : मुंबईचा राजा रोहित शर्मा... विराट कोहलीही प्रेक्षकांचा लाडका... अन् हार्दिकला होणारा विरोध त्वरित मावळला... वानखेडे स्टेडियमवरचे हे गुरुवारचे चित्र मुंबई इंडियन्स या आपल्या संघाने मिळवलेल्या विजयाएवढेच हार्दिक पंड्यासाठी आनंददायी ठरले.

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार झाल्यापासून हार्दिकला अगोदर सोशल मीडियावर आणि आयपीएल सुरू झाल्यानंतर केवळ मुंबईतच नव्हे तर अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये प्रेक्षकांच्या फार मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत आहे, पण गुरुवारी बंगळूर संघाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने केलेल्या एका कृतीमुळे वातावरण बदलले.

IPL 2024 Virat Kohli
Rohit Sharma : एकदिवसीय विश्‍वकरंडकही खेळायचाय : रोहित शर्मा

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हार्दिक पंड्या सायंकाळी नाणेफेकीसाठी आला तेव्हापासून रोहित... रोहित... असे म्हणत हार्दिकला असलेला विरोध प्रेक्षकांनी कायम ठेवला होता, पण मुंबई इंडियन्सचा संघ फलंदाजी सुरू असताना रोहित शर्मा बाद झाल्यावर हार्दिक फलंदाजीस आला त्या वेळी त्याची हुर्यो उडवण्यास सुरुवात झाली होती; परंतु सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने प्रेक्षकांकडे पाहून... असे करू नका. तोसुद्धा भारतीय संघाचा खेळाडू आहे, त्याचा सन्मान ठेवा, लहान मुलांप्रमाणे तुम्ही वागू नका... अशी हातवारे करून कृती केली आणि क्षणार्धात फरक पडला. हुर्यो उडवणारे तेच प्रेक्षक हार्दिक...हार्दिक...असे म्हणू लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com