
'Super Women' हरलीन देओलचा अप्रतिम झेल - पाहा व्हिडिओ
बीसीसीआयची तीन संघांची Women T20 Challenge स्पर्धा कालपासून पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु झाले आहे. कालचा सामना ट्रेलब्लेझर आणि सुपरनोव्हाज या संघात खेळला. ट्रेलब्लेझरचे (Trailblazers) नेतृत्व भारताची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) केलं तर सुपरनोव्हाजचे (Supernovas) नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले. सुपरनोव्हा आणि ट्रेलब्लेजर्स यांच्यात झालेल्या सामन्यात हरलीन देओलने आपल्या शानदार क्षेत्ररक्षणाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Harleen Deol Best Catch)
हेही वाचा: Women T20 Challenge : 'ही तर महिला आयपीएलची पायाभरणी'
ट्रेलब्लेजर्सच्या इनिंगमध्ये हरलीनने जेमिमा रॉड्रिग्जचा असा शानदार कॅच घेतला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हरलीनचा हा झेल पाहून सर्वजण तिचं कौतुक करत आहेत. ट्रेलब्लेजर्सच्या डावाच्या 14व्या षटकात पूनम आणि जेमिमा सुपरनोव्हाजसाठी फलंदाजी करत होत्या. वाढत्या धावगतीचा दबाव लक्षात घेऊन जेमिमा रॉड्रिग्जने मेघनाच्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू थेट हरलीन देओलकडे कव्हर पॉइंटला गेला. त्यानंतर तिने शानदारपणे डायव्हिंग करत हवेत झेल पकडला. याआधीही हरलीन तिच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर चर्चेत आली आहे.
हेही वाचा: SPN vs TRL : पहिल्याच सामन्यात स्मृतीला हरमनप्रीतने दिली मात
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर हा झेल घेण्याव्यतिरिक्त त्याने फलंदाजी करताना 19 चेंडूत 35 धावा केल्या. या सामन्यात सुपरनोव्हा संघाने ट्रेलब्लेजर्सला 164 धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना ट्रेलब्लेजर्स संघ केवळ 114 धावाच करू शकला आणि 49 धावांनी सामना गमावला.
Web Title: Harleen Deol Takes A Brilliant Catch To Dismiss Jemimah Rodrigues Women Ipl
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..