
Women T20 Challenge : 'ही तर महिला आयपीएलची पायाभरणी'
बीसीसीआयची तीन संघांची Women T20 Challenge स्पर्धा आजपासून पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. आजचा सामना हा ट्रेलब्लेझर आणि सुपरनोव्हाज या संघात होणार आहे. ट्रेलब्लेझरचे (Trailblazers) नेतृत्व भारताची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana ) करणार आहे. तर सुपरनोव्हाजचे (Supernovas )नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले. आहे. त्यामुळे आजचा सामना हा भारतीय संघातील कर्णधार आणि उपकर्णधारामध्ये रंगणार आहे.
हेही वाचा: IPL 2022 : दहा कोटींची बोली लागलेल्या खेळाडूंची कशी झाली कामगिरी?
याबाबत प्रतिक्रिया देताना स्मृती मानधना म्हणाली की, 'टी 20 चॅलेंजर ही स्पर्धा महिला आयपीएलची (Women's IPL) एक पायाभरणी असल्यासारखी आहे. त्यामुळे टी 20 चॅलेंज स्पर्धेला चांगलेच महत्व प्राप्त होते. आपल्याला या स्पर्धेद्वारे देशभरात महिला क्रिकेट वर्तुळात असणाऱ्या गुणवान खेळाडूंची ओळख होते. त्यांना कामगिरी करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ मिळते. ही एक महिला आयपीएलच्या दृष्टीने चांगली बाब आहे. '
हेही वाचा: टीम इंडियात सिलेक्शन उमरान मलिकचं पण कौतुक इरफान पठाणचं?
ट्रेलब्लेझर (Trailblazers)
स्मृती मानधना (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, साभीनेनी मेघना, शर्मिन अख्तर, रिचा घोष, हेले मॅथ्यूज, सोफिया डंक्ले, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सलमा खातून, रेणुका सिंह, अरुंधती रेड्डी, प्रियांका प्रियदर्शनी, सैका इशाक, श्रद्धा पोखरकर, सुजाता मलिक
सुपरनोव्हाज (Supernovas)
हरमनप्रीत कौर (कर्णधार), मुस्कान मलिक, प्रिया पुनिया, तानिया भाटिया, डेंड्रा डॉटीन, हर्लीन देओल, पूजा वस्त्रकार, सने लूस, सोफी एक्लस्टोन, एलना किंग, आयुशी सोनी, मानसी जोशी, मेघना सिंग, मोनिका पटेल. व्ही चंदू, राशी कनोजिया.
Web Title: Smriti Mandhana Says Women T20 Challenge Is A Stepping Stone For The Women Ipl
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..