हातातून रक्त येऊ लागलं... तरीही हर्षल पटेल मैदानात लढत राहिला

हर्षल पटेलने आपल्या शानदार गोलंदाजीने विजयात मोलाचे योगदान
Harshal Patel IPL 2022:
Harshal Patel IPL 2022:

Harshal Patel IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 14 धावांनी पराभव केला. यासह RCB क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. क्वालिफायर 2 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आता 27 मे ला राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. सामन्यांमध्ये हर्षल पटेलने आपल्या शानदार गोलंदाजीने विजयात मोलाचे योगदान दिले.

Harshal Patel IPL 2022:
IPL ट्रॉफी जिंकण्याचे कोहलीचे स्वप्न पूर्ण करणार; RCB चा 'हा' खेळाडू

लखनौ सुपर जायंट्स विरुद्व कालच्या एलिमिनेटर सामन्यात हर्षल पटेलने चार षटकांच्या कोट्यात 25 धावा देऊन एक बळी घेतला. लखनौला शेवटच्या तीन षटकात विजयासाठी 41 धावांची गरज होती. ज्यामध्ये हर्षलने 18 वी आणि 20 वी ओव्हर टाकली. त्यामध्ये त्याने 17 धावा दिल्या 18व्या षटकात हर्षलने मार्कस स्टॉइनिसची विकेटही घेतली.

गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात हर्षलला दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करताना चेंडू त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा आणि तर्जनीचा मधला भाग फाटला होता. तरी पण हर्षलने एलिमिनेटर सामना खेळण्यासाठी मैदानात उतरून आपले गोलंदाजीचे कौशल्य दाखवले. या सामन्यादरम्यानही तो दुखापतग्रस्त होऊन बाहेर गेला, मात्र त्याने हार मानली नाही. सामन्यानंतर समालोचकांशी संवाद साधताना हर्षल म्हणाला, माझा हात ठीक आहे, पण तरीही काही समस्या आहे. अंगठा खूप ताणल्याने दुखत आहे.

Harshal Patel IPL 2022:
धक्कादायक! धवनला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; मार खातानाचा Video Viral

सामना संपल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना हर्षल डाव्या हाताने लखनौ टीमच्या सदस्यांशी हस्तांदोलन करत होता. RBC आता 27 मे रोजी दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सशी खेळणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com