IPL ट्रॉफी जिंकण्याचे कोहलीचे स्वप्न पूर्ण करणार RCB चा 'हा' खेळाडू

एक खेळाडू यावेळी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे विराट कोहलीचे अधुरे स्वप्न पूर्ण करू शकतो.
Virat Kohli Dream Of Wining IPL Trophy RCB Rajat Patidar
Virat Kohli Dream Of Wining IPL Trophy RCB Rajat Patidar

Rajat Patidar IPL: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात बुधवारी एलिमिनेटर सामना खेळला गेला. IPL 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लखनौ सुपर जायंट्सचा 14 धावांनी पराभव केला. यासह RCB क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. क्वालिफायर 2 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आता 27 मे ला राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. प्रथमच आयपीएल खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले.(Virat Kohli Dream Of Wining IPL Trophy RCB Rajat Patidar Will Be Completed)

Virat Kohli Dream Of Wining IPL Trophy RCB Rajat Patidar
धक्कादायक! धवनला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; मार खातानाचा Video Viral

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव केला तर RCB फायनल मध्ये जाईल. फायनलमध्ये पोहोचल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना 29 मे रोजी गुजरात टायटन्सशी होईल, परंतु RCB चे हे स्वप्न पूर्ण करणे अजून बाकी आहे. एक खेळाडू आहे जो आरसीबीसाठी वरदान ठरु शकतो, आणि यावेळी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे विराट कोहलीचे अधुरे स्वप्न पूर्ण करू शकतो.

Virat Kohli Dream Of Wining IPL Trophy RCB Rajat Patidar
Rajat Patidar | 'शतकवीर' रजत, सेहवाग - वॉटसनच्या यादीत दाखल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज रजत पाटीदार याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात शतक ठोकून आरसीबीचा संघ आयपीएल ट्रॉफी जिंकणारच असल्याच जाहीर केले आहे. रजत पाटीदारने लखनौ सुपरजायंट्स विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात अवघ्या 49 चेंडूत शतक केलं. पाटीदारने 54 चेंडूत 112 धावा केल्या, त्यामध्ये 12 चौकार आणि 7 षटकार मारले.

Virat Kohli Dream Of Wining IPL Trophy RCB Rajat Patidar
'मी तर 600 रन केल्या'..: लखनऊच्या पराभवानंतर केएल राहुल झाला ट्रोल

रजत पाटीदारने IPL 2022 च्या नॉकआऊट सामन्यात लखनौ सुपरजायंट्स (LSG) विरुद्ध शानदार खेळी करून दाखवून दिले की तो मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे. रजत पाटीदार विराट कोहलीचे आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com