What MI needs to finish in top 2 of IPL points table इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील क्वालिफायर १ ची चुरस आता मजेशीर झाली आहे. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांना मागील सामन्यात हार पत्करावी लागली. काल पंजाब किंग्सला दिल्ली कॅपिटल्सने पराभूत केले आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सचे क्वालिफायर १ मध्ये पोहोचण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. GT, RCB, PBKS यांच्या पराभवामुळे क्वालिफायर १ चे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. साखळी फेरीचे चार सामने शिल्लक आहेत आणि त्यावर सर्व गणित अवलंबून आहे.