11 years later, Punjab Kings are back in the IPL Final : आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाबचा संघ आपल्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीसाठी सज्ज झाला आहे. २०१४ नंतर पंजाबने पहिल्यांदाचा अंतिम फेरी गाठली असून यंदा कोणत्याही परिस्थिती विजेतेपद पटकावण्याचा पंजाबचा प्रयत्न असणार आहे.