Mohammad Siraj
Mohammad Siraj

Mohammad Siraj : 'सॉरी मला माफ कर...' शिवीगाळ केल्यानंतर मोहम्मद सिराजने मागितली माफी

लाईव्ह मॅचदरम्यान सहकारी खेळाडूला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. अशातच त्याने लाईव्ह मॅचदरम्यान सहकारी खेळाडूला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या सहकारी खेळाडूची माफी मागितली आहे. (I Am So Angry Mohammad Siraj apologized after Abuses Fellow Teammate Mahipal Lomror )

चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे सिराजला राग अनावर झाला. सहकारी महिपाल लोमरोरवर चांगलाच चिडला. सिराजने लोमरांनाही शिवीगाळ केली.

या घटनेनंतर त्यांने खुलेआम माफी मागितली आहे. मी खूप रागीट माणूस आहे. माफ कर, काय नाव महिपाल, कृपया मला माफ कर. मी दोनदा माफी मागितली आहे. तो राग फिल्डपर्यंतच राहतो, त्यानंतर माझा राग शांत होतो, असं सिराज यावेळी म्हणाला.

व्हि़डिओमध्ये सिराज 'काय नाव त्याचं महिपाल', असं उच्चारताना दिसत आहे. आपल्याच संघातील खेळाडूचं नाव सिराजला माहिती कसं नाही? असा सवाल आता नेटकरी विचारताना दिसत आहेत.

नेमकं काय झालं?

आरआरच्या डावाच्या 19व्या षटकात ही घटना घडली. ध्रुव जुरेल आणि रविचंद्रन अश्विन मैदानावर फलंदाजी करत होते. सिराजच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जुरेलने मिड-ऑनच्या दिशेने शॉट खेळला.

येथे महिपाल लोमरोरने शानदार क्षेत्ररक्षण केले, चेंडू पकडला आणि तो नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी फेकला. यानंतर सिराजने चेंडू पकडला, पण तो विरोधी फलंदाजाला बाद करू शकला नाही.

इकडे सिराज बॅट्समनला रनआउट करू न शकल्यामुळे रागाने लाल झाला आणि त्याने आपला सगळा राग महिपाल लोमरवर काढला. सिराजने सहकारी खेळाडूलाही शिवीगाळ केली, तरीही लोमररने सिराजच्या रागावर प्रतिक्रिया दिली नाही आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणावर परतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com