IPL 2024 Impact Player : 'इम्पॅक्ट प्लेअर' नियमामुळे अष्टपैलू खेळाडू मरतोय? अन् टीम इंडियाला बसतोय फटका

आयपीएल 2024 मध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम हा खूप चर्चेचा विषय बनला आहे.
Impact player a hit for IPL 2024 but is it good for Indian
Impact player a hit for IPL 2024 but is it good for IndianEsakal

IPL 2024 Impact Player : आयपीएल 2024 मध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम हा खूप चर्चेचा विषय बनला आहे. या नियमानुसार, सर्व संघांकडे प्रत्येक सामन्यासाठी 5 इम्पॅक्ट प्लेयर असतात. त्यापैकी संघ एका खेळाडूचा वापर करू शकतो. प्रत्येक सामन्यात संघ या नियमानुसार एका खेळाडूचा वापर करतो.

सामन्यादरम्यान एखाद्या संघाला फलंदाजाची गरज भासल्यास संघ एखाद्या खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर करतो, त्यानंतर अकरामधील खेळाडूला मैदानाबाहेर बसावे लागते.

जर एखाद्या संघाला गोलंदाजाची गरज असेल तर संघ गोलंदाजाचा वापर करतो. आयपीएलमधील सर्व संघ या नियमाचा पुरेपूर फायदा घेत असले तरी या नियमाचा थेट परिणाम अष्टपैलू खेळाडूंवर होताना दिसत आहे. जे टीम इंडियासाठी चांगले नाही.

Impact player a hit for IPL 2024 but is it good for Indian
Team India Squad T20 WC : उपकर्णधाराच्या जागेवर टांगती तलवार! मुंबईच्या पठ्ठ्यामुळे हार्दिक पांड्या संघातून जाणार बाहेर?

इम्पॅक्ट खेळाडू नियमाचा भारताला

एका माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूने इम्पॅक्ट खेळाडू या नव्या नियमाबद्दल नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, इम्पॅक्ट खेळाडू हा नवा नियम आयपीएलमध्ये गाजतोय. क्रिकेटप्रेमींनाही हे आवडत आहे; पण भारतीय क्रिकेट संघाला या नव्या नियमाचा फटका बसतो आहे. नव्या नियमामुळे पूर्णपणे तंदुरुस्त नसलेला हार्दिक पंड्याही गोलंदाजी करीत आहे.

Impact player a hit for IPL 2024 but is it good for Indian
Team India Squad : 20 खेळाडूंची नावे आली समोर... T20 World Cup मध्ये कोणाला मिळणार संधी?

इम्पॅक्ट खेळाडू हा नियम नसता, तर चेन्नईकडून शिवम दुबेला सातत्याने गोलंदाजी दिली गेली असती; पण आता नव्या नियमामुळे त्याला गोलंदाजी देण्यात येत नाही. त्यामुळे निवड समितीला शिवम कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतो, हेच माहीत नाही. राहुल तेवतिया हा खरेतर अष्टपैलू खेळाडू; पण त्याची इम्पॅक्ट खेळाडू म्हणून निवड केली जाते, त्यामुळे फिरकी गोलंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या तेवतिया याला गोलंदाजी करता येत नाही.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com