अरेच्या, ६ अंदाज तेही बरोबर! पठ्ठ्याने एप्रिलपर्यंतच्या सामन्याचे विजेते जाहीर केले, Dream 11 बनवण्यापूर्वी आज कोण जिंकणार ते पाहा...

Who will win today's IPL match prediction SRH vs LSG? : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या १८ व्या पर्वाला सुरुवात झाली... एक शतकही पाहायला मिळालं, दोन खेळाडू शतकासमीप पोहोचून नाबाद राहिले.. आयपीएलचा ज्वर हा असाच रंग पकडत चालला आहे आणि चाहत्यांनी उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.
Indian Premier League 2025 Match winning predictions
Indian Premier League 2025 Match winning predictionsesakal
Updated on

Unbelievable Cricket Predictions – 6/6 Right! Who will win today's SRH vs LSG? इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ही नुसती स्पर्धा नाही, तर प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या भावनेशी जुळलेली नाळ आहे. त्यामुळेच प्रत्येक सामना पाहण्यासाठी खिशाला चटका बसूनही चाहते मोठ्या संख्येने स्टेडियमवर उपस्थित राहिलेले दिसले आहेत. प्रत्येक संघाचे चाहते, आपलाच संघ जिंकेल असे दावे करताना दिसत आहेत. काहींच्या पदरी निराशा येत असली तरी साखळी फेरीची लीग असल्याने सर्व संघांना जेतेपदापर्यंत पोहोचण्याची समान संधी मिळत आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांत कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी प्रत्येकी २ सामने खेळले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सहा सामन्यांतील विजेत्या संघाचे अंदाज आधीच लावले गेले होते आणि ते तंतोतंत खरे ठरले आहेत. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. त्यामुळेच सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातल्या लढतीत आज कोण बाजी मारेल, हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com