मोठी बातमी! रोहित शर्मा खेळणार नाही ? BCCI कडे केली मागणी | Rohit Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indian captain rohit sharma bcci for short break from ind vs sa series

मोठी बातमी! रोहित शर्मा खेळणार नाही ? BCCI कडे केली मागणी

आयपीएल संपल्यानंतर भारताला 9 ते 19 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. IPL 2022 चा लीग सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने BCCI कडे ब्रेकची मागणी केली आहे. दक्षिण आफ्रिका, आयर्लंड मालिका आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवडण्यासाठी बीसीसीआय निवड समिती आज बैठक घेणार आहे.(indian captain rohit sharma bcci for short break from ind vs sa series)

हेही वाचा: RCB च्या कर्णधाराने मॅचपूर्वी मला मेसेज केला होता...' टीम डेव्हिडचा खुलासा

निवडकर्त्यांना दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संघातील काही वरिष्ठ खेळाडूंची निवड करायची होती तेव्हा रोहित शर्माने ब्रेकची मागणी केली आहे. त्यामागील कारण म्हणजे भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले मजबूत बाजू पाठवायची आहे. मात्र रोहित शर्मा काही फॉर्म आलेला दिसत नाही. त्यामुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्व सामने खेळले पण विशेषत कामगिरी करत आली नाही. इंग्लंड दौऱ्यासाठी रोहितला माइंड फ्रेश करायची इच्छा आहे.

हेही वाचा: मुंबईच्या विजयावर RCB चा जल्लोष; विराटचा जबरदस्त डान्स - Video

आयपीएल मध्ये रोहित शर्माची कामगिरी निराशाजनक होती कारण त्याने 19.14 च्या सरासरीने केवळ 268 धावा केल्या. रोहितला एकही अर्धशतक करता आलेले नाही. रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहितचा संघर्ष दिसत होता. रोहित शर्माला खाते उघडण्यासाठी 10 चेंडूंचा सामना करायला लागला. शेवटी 13व्या चेंडूवर एनरिक नॉर्टजेने त्याला बाद केले. आयपीएलच्या मागील 22 डावांमध्ये त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. तो 14 डावांपैकी 5 वेळा सिंगल डिजिटवर म्हणजेच 10 पेक्षा कमी धावांवर बाद झाला आहे.

Web Title: Indian Captain Rohit Sharma Bcci For Short Break From Ind Vs Sa Series 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top