T20 World Cup Team India: टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Indian Players who failed to perform in IPL: रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे जे टी-20 वर्ल्ड कप संघाची घोषणा झाल्यानंतर ठरले फ्लॉप...!
Indian Players Flopped in IPL after T20 World Cup Selection
Indian Players Flopped in IPL after T20 World Cup SelectionSAKAL

Indian Players Flopped in IPL after T20 World Cup Selection : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, संघ जाहीर झाल्यापासून या संघात निवड झालेले सहा खेळाडू फ्लॉप ठरले आहेत. या यादीत रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे जे टी-20 वर्ल्ड कप संघाची घोषणा झाल्यानंतर फ्लॉप ठरले आहेत.

Indian Players Flopped in IPL after T20 World Cup Selection
CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

रोहित शर्मा -

मुंबई इंडियन्सचा सलामीवीर आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा संघ जाहीर झाल्यानंतर फ्लॉप ठरणारा पहिला खेळाडू होता. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याला केवळ 4 धावा करता आल्या.

सूर्यकुमार यादव –

लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवही फ्लॉप ठरला. 6 चेंडूत 10 धावा करून तो आऊट झाला. त्याची टी-20 वर्ल्ड कप संघातही निवड झाली आहे.

हार्दिक पांड्या -

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या देखील ठरला फ्लॉप. लखनौविरुद्धच्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता आऊट झाला. मात्र, गोलंदाजीत त्याने दोन विकेट्स घेतल्या हे कुठेतरी चांगले आहे.

Indian Players Flopped in IPL after T20 World Cup Selection
रिंकू सिंगला T20 World Cup 2024 च्या संघात का नाही मिळाली संधी? दिग्गज खेळाडूने सांगितले कारण

शिवम दुबे -

टीम इंडियात यावेळी शिवम दुबेची अष्टपैलू म्हणून निवड करण्यात आली आहे. आयपीएलच्या या हंगामात त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याची टी-20 वर्ल्ड कप संघात निवड झाली. मात्र, संघ निवडल्यानंतर तोही फ्लॉप ठरला आणि पंजाब किंग्जविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. गोलंदाजीत त्याने निश्चितपणे 1 बळी घेतला.

रवींद्र जडेजा -

रवींद्र जडेजाही काही विशेष कामगिरी करू शकला नाही. आणि पंजाब किंग्जविरुद्ध केवळ 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आणि गोलंदाजीत त्याला एक पण विकेट घेता आला नाही.

अर्शदीप सिंग –

अर्शदीप सिंगचीही निवड झाली पण तोही फ्लॉप झाला. त्याने 4 षटकात 52 धावा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com