IPL 2021 : दुबईच्या मैदानात राजस्थानचा 'रॉयल' विजय

दोन्ही संघ उर्वरित सामन्यात दमदार कामगिरी करुन प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी प्रयत्नशील असतील.
PBKS vs RR
PBKS vs RR

Punjab Kings vs Rajasthan Royals 32nd Match : कार्तिक त्यागीनं अखेरच्या षटकात सुरेख गोलंदाजी करत पंजाबच्या हाती गेलेला सामना रॉयल चॅलेजर्सच्या खिशात टाकला. अखेरच्या षटकात पंजाबला अवघ्या 4 धावांची आवश्यकता होती. या षटकात कार्तिक त्यागीनं 1 धाव खर्च करत दोन विकेट घेतल्या. राजस्थान रॉयल्सने 2 धावांनी सामना जिंकत गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. अर्शदीपने घेतलेल्या पाच विकेटवर कार्तिक त्यागीची एक ओव्हर भारी पडली.

राजस्थानने दिलेल्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी शतकी भागीदारी करत संघाला मजबूत सुरुवात करुन दिली. या जोडीच्या खेळीच्या जोरावर पंजाब सहज पार करेल असे वाटत होते. पण अखेरच्या षटकात पंजाबवर पराभवाची नामुष्की ओढावली.

पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटिंग करताना एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांनी राजस्थानच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी परतल्यानंतर लिविंगस्टोन 25 आणि महिपाल लोमरेर 43 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघ निर्धारित 20 षटकात 185 धावांत ऑल आउट झाला. पंजाबकडून अर्शदिपनं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. त्याला शमीने 3 विकेट घेऊन उत्तम साथ दिली.

कार्तिक त्यागीनं हातून निसटलेला सामना जिंकून दिला त्याने अखेरच्या षटकात 1 धाव खर्च करुन 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या

183-4 : कार्तिक त्यागीनं दीपक हुड्डाला खातेही उघडू दिले नाही

183-3 : निकोलस पूरनच्या रुपात पंजाबला तिसरा धक्का, त्याने 22 चेंडूत 32 धावा केल्या.

126-2 : मयांक अग्रवालच्या रुपात पंजाबला दुसरा धक्का, त्याने 43 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 67 धावांची खेळी केली

120-1 : केएल राहुलचं अर्धशतक हुकलं 49(33), चेतन सकारियाला मिळाली विकेट

पंजाबच्या सलामी जोडीनं पूर्ण केली शतकी भागीदारी!

मयांकने 34 व्या चेंडूवर षटकार खेचत साजर केलं अर्धशतक, आयपीएलमध्ये पार केला 2000 धावांचा टप्पा

कर्णधार लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल या जोडीनं पंजाबच्या संघाला जबरदस्त सुरुवात करुन दिली आहे. दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण करत राजस्थानला बॅकफूटवर ढकलले.

ममपंजाबसमोर 120 चेंडूत 186 धावांचे लक्ष्य

185-10 : कार्तिक त्यागीला बाद करत अर्शदीपनं मिळवली पाचवी विकेट

185-9 : सकारियाच्या रुपात अर्शदीपच्या खात्यात आणखी एक विकेट

178-8 : मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला मॉरिस स्वस्तात माघारी. शमीन 5 धावांवर धाडले माघारी

175-7 : राहुल तेवतिया अवघ्या 2 धावांची भर घालून माघारी, शमीला मिळाले दुसरे यश

169-6 : महिपाल लोमरेरच्या तुफान फटकेबाजीला अर्शदीपनं लावला ब्रेक, त्याने 17 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारासह कुटल्या 43 धावा

166-5 रियान पराग 4 धावा करुन माघारी, शमीला मिळाली पहिली विकेट

136-4 : यशस्वी जयस्वालचं अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकलं, हरमनप्रीत ब्रारनं घेतली विकेट

116-3 : लायम लिविंगस्टोन 25 धावांची भर घालून माघारी, अर्शदिपचं सामन्यातील दुसरे यश

68-2 : राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन स्वस्तात माघारी, ईशान पोरेलनं अवघ्या 4 धावांवर धाडले तंबूत

54-1 : राजस्थानच्या संघाला पहिला धक्का, अर्शदिप सिंगने एविन लुईसला 36 धावा धाडले माघारी

यशस्वी जयस्वाल आणि एविन लुईस जोडीची पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीरी

राजस्थान रॉयल्स Rajasthan Royals (Playing XI):

यशस्वी जयस्वाल, एविन लुईस, संजू सॅमसन (यष्टरक्षक/ कर्णधार), लायम लिविंगस्टोन, महिपाल लोमरार, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, मुस्तफिझूर रहमान, चेतन सकारिया, कार्तिक त्यागी.

पंजाबचा संघ Punjab Kings (Playing XI):

केएल राहुल (यष्टीरक्षक/ कर्णधार) मयांक अग्रवाल, एडन मार्करम, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, फेबिन एलेन, आदिल रशिद, हरप्रित ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, ईशान पोरेल.

पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

आकडेवारीच्या बाबतीत संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स लोकेश राहुलच्या पंजाबपेक्षा भारी ठरतोय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com