गुजरातसाठी आता प्लेऑफचा सराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुजरातसाठी आता प्लेऑफचा सराव; चेन्नईविरुद्ध आज सामना

गुजरातसाठी आता प्लेऑफचा सराव; चेन्नईविरुद्ध आज सामना

मुंबई : अव्वल स्थानावर असलेल्या आणि प्लेऑफ सर्वात अगोदर निश्चित करणाऱ्या गुजरातचा उद्या आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नईविरुद्ध सामना होत आहे. या सामन्याच्या निकालाचा काहीही महत्त्व नसले तरी गुजरातच्या संघासाठी प्लेऑफसाठी सराव या लढतीद्वारे करता येणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात संघाचे १२ सामन्यांतून सर्वाधिक १८ गुण झाले आहेत. आता त्यांचे दोनच साखळी सामने शिल्लक आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यासह अखेरच्या साखळी सामन्यात ते राखीव खेळाडूंना संधी देणार हे निश्चित आहे.

त्यांच्यापाठोपाठ असलेल्या लखनौ आणि राजस्थान यांनी त्यांचे पुढचे साखळी सामने जिंकले तरी गुजरात पहिल्या दोन संघांत राहाणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे `क्लॉलिफायर -१` ही महत्त्वाची लढत खेळण्याची संधी त्यांना मिळणार आहे. सर्व घडामोडी त्यांच्या बाजूने असल्या तरी ते गाफील राहाणार नाहीत. आयपीएलमध्ये लय सर्वात महत्त्वाची समजली जाते. सलग दोन पराभवानंतर त्यांनी लखनौला हरवत विजयाची लय पुन्हा मिळवली आहे. उरलेल्या साखळी सामन्यातही ही लय बाद फेरीसाठी कायम ठेवणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असेल.

रशीद आणि शमीला विश्रांती

लेगस्पिनर रशीद खान आणि वेगवान गोलंदाज महम्मद शमी हे गुजरातसाठी प्रमुख गोलंदाज राहिले आहेत. सलग १२ सामने ते खेळले आहेत. उद्याचा सामना दुपारी ३.३० वाजता सुरू होणार असल्यामुळे त्यांना विश्रांती दिली जाऊ शकते.

चेन्नई संघातही बदल अपेक्षित

गतविजेत्या चेन्नई संघाकडे आता गमावण्यासारखे काहीच नाही. मुंबईविरुद्ध पराभवासह आव्हान संपुष्टात आल्यानंतर चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी पुढच्या सामन्यांसाठी राखीव खेळाडूंना संधी दिली जाण्याचे सांगितले होते.

Web Title: Indian Premier League Ipl 2022 Csk Vs Gt Head To Head Records Chennai Super Kings Against Gujarat Titans Ipl 2022 Playoff Practice

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top