सीबीआय IPL 2019 च्या बेटिंग प्रकरणातील पाकिस्तान अँगल तपासणार IPL 2019 betting CBI has filed two cases alleged Pakistan connection | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 IPL betting

सीबीआय IPL 2019 च्या बेटिंग प्रकरणातील पाकिस्तान अँगल तपासणार

नवी दिल्ली : सीबीआयने आयपीएल 2019 (IPL 2022) च्या बेटिंग (Betting) प्रकरणी दोन गुन्हे नोंदवले आहेत. सीबीआयला शंका आहे की हे बेटिंगचे नेटवर्क आयपीएलच्या सामन्यांचे निकाल प्रभवावित करण्याचा प्रयत्न करत होते. याबाबतचे इनपुट्स त्यांना पाकिस्तानातून (Pakistan) मिळत होते.

'काही व्यक्ती क्रिकेट बेटिंग रॅकेट चालवत होते. ते आयपीएलमधील सामन्यांचे निकाल प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना याबाबत पाकिस्तानातून इनपूट मिळत होते. ते सामन्य लोकांना फसवून त्यांना आयपीएल बेटिंगमध्ये सामील करून घेत होते.' असा सीबीआयच्या एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

हेही वाचा: विराट बाद झाल्यावर पंजाबने केली पोस्ट; चाहते झाले फिदा

सीबीआयने आरोप केला आहे की या प्रकरणातील आरोपींनी खोट्या ओळखपत्रांच्या आधारे एक बँक अकाऊंट उघडले होते. हे अकाऊंट उघडताना त्यांनी खोटी कागदपत्रे, खोट्या जन्मतारखा दिल्या होत्या. एफआयआरनुसार 'भारतीय सामन्य नागरिकांकडून बेटिंगसाठी पैसे घेण्यात आले. यातील काही रक्कम ही विदेशातील त्यांच्या सहकाऱ्यांपर्यंतही हवालाच्या मार्फत पोहचवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बेटिंग रॅकेट चालवणारी लोकं 2013 पासून क्रिकेट बेटिंगमध्ये सामील आहेत.'

हेही वाचा: IPL 2022: आजचा सामना श्रेयससाठी आहे खुप खास, काय आहे कारण?

या प्रकरणातील आरोपी दिलीप कुमारने काही शंकास्पद आर्थिक व्यवहार केल्याचे आढळून आले आहेत. तो दिल्लीत राहतो. तसेच या प्रकरणातील दुसरा आरोपी गुर्राम सतीश हैदराबादमध्ये राहतो. हे दोघे त्यांच्या साथीदारांसह पाकिस्तानात असलेल्या संशयीत वकास मलिक याच्यावर पाकिस्तानी फोन नंबरवरून संपर्कात होते. अशा प्रकारच्या दुसऱ्या एका केसमध्ये सीबीआयने राजस्थानमधील सज्जन सिंह, प्रभू लाल मीना, राम अवतार, अमित कुमार शर्मा यांच्यावर गुन्हा दाखले केला आहे.

Web Title: Ipl 2019 Betting Cbi Has Filed Two Cases Alleged Pakistan Connection

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top