विराट बाद झाल्यावर पंजाबने केली पोस्ट; चाहते झाले फिदा | Punjab Kings' Post For Virat Kohli Is A Massive Hit On Instagram | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

virat kohli reaction after wicket punjab kings viral
विराट बाद झाल्यावर पंजाबने केले ट्विट; चाहते झाले फिदा

विराट बाद झाल्यावर पंजाबने केली पोस्ट; चाहते झाले फिदा

टीम इंडियाचा किंग म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. अनेक प्रयत्न करुनही त्याला यश मिळेना. अनेक चाहते त्याच्या खेळीवर नाराज आहेत. चाहतेच काय तो स्वतःच त्याच्या खेळीवर निराश झाला आहे. किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट जेव्हा आऊट झाला तेव्हा त्याने निराश होत आकाशाकडे पाहिलं. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अशातच, पंजाब किंग्ज संघाने विराटसाठी खास पोस्ट केली आहे.

पंजाब किंग्जविरुद्धच्या शुक्रवारीच्या सामन्यात कोहली काहीसा उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने लाँग ऑनवर षटकार तसंच कव्हर ड्राईव्हवर चौकार ठोकला होता, पण चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याच्या दुर्दैवाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता पाहिला.

हेही वाचा: मायकल वॉनचा Virat Kohli ला सल्ला; 'लग्नापूर्वीचा विराट हो'

आपली विकेट पडल्यानंतर विराट आकाशाकडे पाहतो आणि तो जोरात ओरडतो. त्याला हाताश झालेल पाहून मैदानावर सर्वजन निराश होतात.

दरम्यान याच दरम्यानचा त्याचा फोटो ट्विट करत पंजाबने विराटसाठी खास कॅप्शन केली आहे. 'इथेपर्यंत आम्हीदेखील याचा आनंद लुटला. आशा आहे की, त्याला त्याचे नशीब लवकरच साथ देईल.' अशा शब्दात पंजाबने विराटसाठी खास प्रार्थना केली आहे.

हेही वाचा: VIDEO: कोहली माणसावर नाही तर 'देवावर' नाराज; आकाशात पाहिल्यानंतर म्हणाला...

विराट कोहली 13 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 20 धावांवर खेळत होता. डावाच्या चौथ्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या कागिसो रबाडाने दुसरा चेंडू कोहलीच्या कंबरेला लागला आणि शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने उभ्या असलेल्या राहुल चहरच्या हातात गेला. पंचांनी कोहलीला नाबाद घोषित केले, पण पंजाबने डीआरएसची मागणी केली. थर्ड अंपायरलाने कोहलीला बाद घोषित केले.

Web Title: Punjab Kings Post For Virat Kohli Is A Massive Hit On Instagram

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top