esakal | IPL 2021 : शारजहात वादळ; टॉस लांबणीवर
sakal

बोलून बातमी शोधा

RCB vs CSK

IPL 2021 : शारजहात वादळ; टॉस लांबणीवर

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 RCB vs CSK : किंग कोहली आणि कूल कॅप्टन महेंद्र सिंह धोनी यांच्यातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी शारजहाच्या मैदानात वादळानं धडक दिलीये. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सामन्याच्या नाणेफेकी नियोजित वेळेत झालेली नाही. भारतीय प्रमाणवेळेनुसार 7 वाजून 25 मिनिटांनी पुन्हा मैदानाची पाहणी करण्यात येणार असून सामना सुरु होणार की नाही याचे चित्र स्पष्ट होईल.

चेन्नई सुपर किंग्जने दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला धमाकेदार सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर आणखी एक विजय नोंवण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरतील. दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. संघ शंभरीच्या आतच गुंडाळला होता. या पराभवातून सावरून बंगळुरुचा संघ चेन्नईला कशी फाइट देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: IPL 2021: मुंबई संघावर तब्बल १३ वर्षांनी ओढवली 'ही' नामुष्की

आयपीएल 2021 च्या पहिल्या हंगामात या दोन्ही संघात लढत झाली होती. यात चेन्नई सुपर किंग्जचा संघच भारी ठरला होता. या सामन्यात रविंद्र जाडेजाने अक्षर पटेलच्या एका षटकात 37 धावा कुटण्याचा विक्रम नोंदवला होता. अक्षर पटेल हा पर्पल कॅपच्या यादीत अव्वलस्थानी आहे.

loading image
go to top