IPL 2021: मुंबई संघावर तब्बल १३ वर्षांनी ओढवली 'ही' नामुष्की

Rohit-Sharma-Sad
Rohit-Sharma-Sad
Summary

कोलकाताच्या युवा ब्रिगेडने मुंबईच्या गोलंदाजांची केली धुलाई

IPL 2021 MI vs KKR: कोलकाताने मुंबईवर ७ गडी राखून विजय मिळवला. मुंबईने सलामीवीर क्विंटन डी कॉक याने अर्धशतकी खेळीच्या (५५) जोरावर २० षटकात ६ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग कोलकाताचा शुबमन गिल लवकर बाद झाला. पण कोलकाता संघाचा दुसरा सलामीवीर व्यंकटेश अय्यर (५३) आणि राहुल त्रिपाठी (७४*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर KKR ने मुंबईवर धडाकेबाज विजय मिळवला. या पराभवामुळे मुंबई इंडियन्स संघावर तब्बल १३ वर्षांनी नामुष्की ओढवली.

Rohit-Sharma-Sad
IPL 2021 Points Table: कोलकाताचा मुंबई इंडियन्सला 'दे धक्का'

मुंबईच्या संघाने १५० पेक्षा जास्त म्हणजेच १५५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या संघाने अगदी सहज मुंबईवर विजय मिळवला. मुंबईच्या गोलंदाजांची कामगिरी पाहता १५० पेक्षा जास्त धावांचे आव्हान दिले असताना प्रतिस्पर्धी संघाला विजयासाठी नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. पण काल कोलकाताने सामना सहज जिंकला. या आधी मुंबईवर अशी नामुष्की २००८ साली ओढवली होती. मुंबईने १५४ धावा करून १५५ धावांचे आव्हान डेक्कन चार्जर्स संघाला दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग डेक्कन चार्जर्सने १२ षटकांत केला होता. कर्णधार अडम गिलक्रिस्टने नाबाद १०९ तर व्हीव्हीएस लक्ष्मणने नाबाद ३७ धावा करून १० गड्यांनी सामना जिंकला होता.

Rohit-Sharma-Sad
IPL 2021 MI vs KKR Highlights Video: कोलकाताचा मुंबईवर विजय!

कोलकाताच्या दोन युवा फलंदाजांनी मुंबईच्या स्टार गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. कोलकाताचा सलामीवीर व्यंकटेश अय्यर याने दमदार अर्धशतक ठोकले. त्याने ३० चेंडूत ५३ धावा केल्या. त्यानंतर राहुल त्रिपाठीने आपला अनुभव पणाला लावत ४२ चेंडूत नाबाद ७४ धावा कुटल्या आणि संघाला दमदार विजय मिळवून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com