esakal | RCB Team: 'अशा खेळाडूला संघात ठेवायचंच कशासाठी?'; लाराचा संतप्त सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

'अशा खेळाडूला संघात ठेवायचंच कशासाठी?'; लाराचा संतप्त सवाल

संपूर्ण हंगामात 'त्या' खेळाडूची अतिशय सुमार कामगिरी

'अशा खेळाडूला संघात ठेवायचंच कशासाठी?'; लाराचा संतप्त सवाल

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 RCB vs KKR: विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला बाद फेरीत कोलकाताकडून पराभूत व्हावे लागले. स्पर्धा संपल्यानंतर संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहली आधीच सांगितलं होतं. त्यामुळे काल RCBचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर विराटने कर्णधारपद सोडलं. मी जर RCB संघाचा मालक असतो तर मी विराटला कधीही कर्णधारपद सोडून दिलं नसतं, असं वक्तव्य विंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने केलं. त्यासोबत लाराने एका स्टार खेळाडूच्या खराब कामगिरीवरही ताशेरे ओढले.

हेही वाचा: 'ग्लॅमरस IPL' ... मॅचपेक्षाही 'या' तरूणींच्या अदांचीच चर्चा!

"पुढच्या वर्षीच्या IPL हंगामाआधी महालिलाव होणार आहे. या लिलावात प्रत्येक संघाला आपल्याकडचे तीन खेळाडू संघात कायम ठेवता येतील असा विचार सुरू आहे. मी जर बंगळुरू संघाचा मालक असेन तर मी माझ्या संघात मॅक्सवेलला नक्कीच रिटेन करेन. मॅक्सवेल संघात आला आणि त्याने प्रशिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे खेळ करत चांगली कामगिरी केली. विराट कोहलीदेखील बडा खेळाडू आहे. त्यामुळे मी त्यालाही माझ्या संघात कायम ठेवेन. काही असे खेळाडू आहेत ज्यांना मी लिलावाआधी मुक्त करून पुन्हा संघात घेऊ शकेन. त्यामुळे या गोष्टीचा विचार करता मी तिसरा खेळाडू म्हणून देवदत्त पडीकलला संघात कायम राखेन", असं लाराने स्पष्ट केलं.

हेही वाचा: IPL 2021: कामगिरी CSKच्या ऋतुराजची, शुभेच्छा मात्र सायलीला

"एबी डिव्हिलियर्स हा दमदार फलंदाज आहे. त्याने त्याची कारकिर्द गाजवली यात वादच नाही. पण सध्या त्याच्याकडून धावा होत नाहीयेत. अशा परिस्थितीत मी त्याला माझ्या संघात का ठेवेन? डिव्हिलियर्स निवृत्तीनंतर वर्षभरातील केवळ ६ आठवडे क्रिकेट खेळतोय. त्यामुळे त्याच्या कामगिरीतील सातत्याबद्दल मला शंका आहे. ख्रिस गेल सारखा खेळाडू ४२व्या वर्षी अनेक लीग स्पर्धा खेळताना दिसतो पण तरीही त्याला हवा तसा सूर गवसत नाही. त्यामुळे अशा वेळी मालक म्हणून काही कठीण निर्णय घेतले पाहिजेत", असं लारा म्हणाला.

डिव्हिलियर्सने यंदाच्या हंगामात १५ सामने खेळून ३१३ धावा केल्या. त्यात त्याला केवळ २ अर्धशतके झळकावणं शक्य झालं. संपूर्ण हंगामात त्याने केवळ २३ चौकार आणि १५ षटकार लगावले.

loading image
go to top