esakal | IPL 2021 CSK vs SRH Video: पाहा रंगतदार सामन्याचे Highlights
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021 CSK vs SRH Video: पाहा रंगतदार सामन्याचे Highlights

चेन्नईने हैदराबादला शेवटच्या षटकात केलं पराभूत

IPL 2021 CSK vs SRH Video: पाहा रंगतदार सामन्याचे Highlights

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 CSK vs SRH Highlights: महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा ६ गडी राखून पराभव केला आणि प्ले-ऑफ्समध्ये प्रवेश केला. वृद्धिमान साहाच्या ४४ धावांच्या जोरावर हैदराबादने १३४ धावा केल्या होत्या. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (४५) आणि फाफ डु प्लेसिस (४१) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईने माफक आव्हान पार केले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या खास शैलीत षटकार लगावत सामना संपवला. पाहा सामन्यातील महत्त्वाच्या घटना-

हेही वाचा: Video: धोनी स्टाईलमध्ये विषय END! पाहा MS चा विजयी सिक्सर...

IPL 2021 CSK vs SRH Video: पाहा रंगतदार सामन्याचे Highlights

हेही वाचा: IPL 2021: CSKचा 'प्ले-ऑफ्स'मध्ये दणक्यात प्रवेश! हैदराबाद OUT

चेन्नईचा हैदराबादवर ६ गडी राखून विजय

टॉस जिंकून CSKने आधी गोलंदाजी केली. संथ गतीच्या खेळपट्टीवर गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून दाखवली. गोलंदाजांनी हैदराबादला १३४ धावांतच रोखलं. सलामीवीर वृद्धिमान साहाने ४४ धावा केल्या. पण जेसन रॉय (२), केन विल्यमसन (११), प्रियम गर्ग (७), अभिषेक शर्मा (१८), अब्दुल समद (१८) आणि जेसन होल्डर (५) यांना फारशी चमक दाखवता आली नाही. CSK कडून आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड (४५) आणि फाफ डु प्लेसिस (४१) यांनी शतकी सलामी दिली. त्यानंतर अनुभवी अंबाती रायुडू (१७ नाबाद) आणि कर्णधार धोनी (११ नाबाद) यांनी संघाला विजय मिळवून दिला.

loading image
go to top