IPL 2021: KKR साठी करो या मरोचा सामना असूनही रसल संघाबाहेर, कारण... | Andre Russell | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andre-Russell-KKR

कोलकाताच्या संघात २ महत्त्वाचे बदल, दिल्लीच्या संघात स्मिथला संधी

IPL 2021: 'करो या मरो'च्या सामन्यात रसल संघाबाहेर, कारण...

IPL 2021 in UAE: दिल्लीविरूद्धच्या सामन्यात कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या टप्प्यात कोलकाताने पहिले दोन सामने जिंकले होते. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्यांना चेन्नईकडून पराभूत व्हावे लागले. त्या पराभवामुळे आता कोलकाताला पुढील सर्वच्या सर्व सामने जिंकणे आवश्यक आहेत. अशा 'करो या मरो'च्या सामन्यात कोलकाताने दोन बदल केले. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी धडाकेबाज आंद्रे रसलला संघाबाहेर बसवले.

हेही वाचा: IPL 2021: कृणाल पांड्याचं करायचं काय? मुंबईपुढे मोठा प्रश्न

KKRने काय केले बदल?

आंद्रे रसलला कोलकाता संघाने बाहेर केले. नाणेफेक जिंकल्यानंतर इयॉन मार्गनने याबद्दलची माहिती दिली. आंद्रे रसल संघात का नाही? याबद्दल मॉर्गनने उत्तर दिले. आंद्रे रसल याला दुखापतीमुळे सामन्याला मुकावे लागले आहे, असे मॉर्गनने सांगितले. तसेच, आंद्रे रसलसोबतच प्रसिद्ध कृष्णा यालाही संघातून बाहेर करण्यात आले. गेल्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या एका षटकात रविंद्र जाडेजाने संपूर्ण सामना पालटला होता. त्यामुळे त्याला संघातून बाहेर करण्यात आल्याची शक्यता आहे. या दोघांच्या जागी न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी आणि युवा संदीप वारियर याला संघात स्थान देण्यात आले.

हेही वाचा: Video: खतरनाक स्पिन! धोनीचा वरूण चक्रवर्तीने उडवला त्रिफळा

दिल्लीच्या संघानेही एक बदल केला. पृथ्वी शॉ याला गेल्या काही सामन्यांमध्ये सूर गवसला नव्हता, पण त्याला त्या कारणामुळे बाहेर ठेवण्यात आलेले नाही. पृथ्वी शॉ याला स्नायूंच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी संघाने स्टीव्ह स्मिथला संघात स्थान देण्यात आले. गेल्या सामन्यात मार्कस स्टॉयनीसच्या जागी ललित यादवला संघात स्थान देण्यात आले होते. त्यामुळे गेल्या सामन्यात दिल्लीने तीन परदेशी खेळाडूंनाच स्थान दिले होते. या सामन्यात त्यांनी ललित यादवला संघात कायम ठेवले. पण पृथ्वीच्या जागी मात्र स्टीव्ह स्मिथला संघात स्थान देण्यात आले.

loading image
go to top