esakal | IPL 2021; CSK vs DC : पंतला बर्थडे गिफ्ट; CSK ला पराभूत करत DC टॉपला
sakal

बोलून बातमी शोधा

CSK vs DC

IPL 2021 : पंतला बर्थडे गिफ्ट; CSK ला पराभूत करत DC टॉपला

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 Delhi Capitals vs Chennai Super Kings : अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात पंतच्या दिल्ली कॅपिटल्सने धोनीच्या चेन्नईवर सुपर विजय नोंदवला. दिल्ली कॅपिटल्सने दुबईच्या मैदानात 3 विकेट्सने विजय नोंदवत गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. अखेरच्या षटकात धोनीने ब्रोवोकडे चेंडू सोपवला. पण ब्रावो दिल्ली रोखण्यात अपयशी ठरला. चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या धावाचा पाठलाग करताना दिल्लीने दमदार सुरुवात केली.

पण पृथ्वी शॉ माघारी परतल्यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. अय्यर 2, पंत 15, रिपल पटेल 18 आणि अश्विन अवघ्या 2 धावा करुन माघारी फिरला. सलामीवीर शिखर धवनने एक बाजू सांभाळून ठेवत 35 चेंडूत 39 धावांची आश्वासक खेळी केली. पण त्याची विकेट घेत चेन्नईने सुपर कमबॅकचे संकेत दिले. सामना चेन्नईच्या बाजूनं झुकतोय असे चित्र निर्माण झाले होते. मात्र शिमरॉन हेटमायरने 18 चेंडूत नाबाद 28 धावांची खेळी करत चेन्नईच्या कमबॅकचे इरादे फोल ठरवले. मोक्याच्या क्षणी अक्षर पटेल बाद झाल्यानंतर रबाडाने चौकार खेचून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर थ्रीडी मॅन अंबाती रायडूच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने निर्धारित 20 षटकात 5 बाद 136 धावा केल्या आहेत. फाफ ड्युप्लेसिस 10 आणि ऋतूराज गायकवाड 13 धावा करुन तंबूत परल्यानंतर रॉबिन उथप्पाने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 19 धावांवर अश्विनने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. मोईन अलीही अवघ्या 5 धावांवर बाद झाला.

रायडू आणि धोनीने पाचव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. धोनीने 27 चेंडू खेळले पण त्याला यात एकही मोठा फटका मारता आला नाही. तो 27 चेंडूत 18 धावा करुन बाद झाला. अंबाती रायडूने 43 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 55 धावांची नाबाद खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सकडून अक्षर पटेलनं सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. नोर्तजे. आवेश खान आणि अश्विनला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

ब्रावोच्या चौथ्या चेंडूवर चौकार खेचत रबाडाने दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केला

135-7 : अक्षर पटेलला मोईन अलीकरवी झेलबाद करत ब्रावोनं सामन्यात आणखी ट्विस्ट आणले

99-6 : शार्दुल ठाकूरनं संघाला मिळवून दिलं आणखी एक यश, 35 चेंडूत 39 धावा करुन गब्बर शिखर धवन माघारी

98-5 : शार्दुल ठाकूरनं उडवल्या अश्विनच्या दांड्या, सामन्यात पुन्हा ट्विस्ट

71-3 : पंतच्या रुपात दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक धक्का, जाडेजाच्या गोलंदाजीवर मोईन अलीनं घेतला कॅच. पंतने 12 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार खेचत 15 धावा केल्या.

51-2 : हेजलवूडनं अय्यरला अवघ्या 2 धावांवर दाखवला तंबूचा रस्ता

24-1 : पृथ्वी शॉच्या दीपक चाहरने चेन्नईला मिळवून दिले पहिले यश, शॉनं 12 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 18 धावा केल्या.

अंबाती रायडूच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने निर्धारित 20 षटकात 5 बाद 136 धावांपर्यंत मजल मारली आहे.

132-5 : अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आवेश खानने धोनीला यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद केले. धोनीने 27 चेंडूत 18 धावांची खेळी केली. या खेळीत त्याला एकही मोठा फटका खेळता आला नाही.

दबावात रायडूचा दिमाखदार खेळ; अर्धशतकी खेळीसह दिला डावाला आकार

62-4 : उथप्पाला संधीच सोनं करण्यात अपयश, अश्विननं 19 धावांवर केलं कॉट अँण्ड बोल्ड

59-3 : मोठा फटका खेळण्याच्या नादात मोईन अली अवघ्या पाच धावा करुन माघारी, अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर अय्यरने घेतला कॅच

39-2 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात धमाकेदार कामगिरी करणारा ऋतूराज गायकवाड स्वस्तात माघारी, 13 धावांवर नोर्तजेनं घेतली विकेट

28-1 : अक्षर पटेलनं संघाला मिळवून दिलं पहिलं यश, फाफ ड्युप्लेसिस 10 धावा करुन तंबूत परतला. श्रेयस अय्यरनं घेतला अप्रतिम झेल

असे आहेत दोन्ही संघ

Delhi Capitals (Playing XI): पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक/ कर्णधार), रिपाल पटेल, अक्षर पटेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, अनरिच नोर्तजे.

Chennai Super Kings (Playing XI) : ऋतूराज गायकवाड, फाफ ड्युप्लेसिस, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक /कर्णधार), रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्रावो, दीपक चाहर, जोश हेजलवूड.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पंतने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

loading image
go to top