esakal | DC vs CSK : UAE मध्ये दिल्लीकराचं पहिल अर्धशतक! |Qualifier 1
sakal

बोलून बातमी शोधा

Prithvi Shaw

DC vs CSK : UAE मध्ये दिल्लीकराचं पहिल अर्धशतक!

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL DC vs CSK, Qualifier 1 : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. धवन-पृथ्वी जोडीनं दिल्लीच्या डावाला सुरुवात केली. सुरुवातीला अनुभवी धवन संयमी तर पृथ्वीनं आक्रमक खेळ केला. धवन आणि श्रेयस अय्यरच्या रुपात दोन विकेट पडल्यानंतरही पृथ्वीनं एका बाजूनं आपली आक्रमक खेळी सुरुच ठेवत अर्धशतकाला गवसणी घातली. 27 व्या चेंडूवर जाडेजाला खणखणीत चौकार खेचून पृथ्वीनं अर्धशतक पूर्ण केलं.

DC vs CSK पहिल्या क्वालिफायर लढतीतील अपडेट्स एका क्विकवर

साखळी सामन्यातील 14 सामन्यात 450 + धावा करताना पृथ्वीनं यापूर्वी 3 अर्धशतक केली होती. पण युएईच्या मैदानात एकाही दिल्लीकराने अर्धशतक झळकावले नव्हते. पहिल्या क्वालिफायरच्या लढतीत पृथ्वीच्या भात्यातून दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील पहिले अर्धशतक निघाले. तो मोठ्या खेळीकडे वाटचाल करत असताना रविंद्र जाडेजानेच त्याच्या खेळीला ब्रेक लावला. पृथ्वीनं 34 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील दुसऱ्या षटकात हेजलवूडच्या गोलंदाजीवर पृथ्वीने आक्रमक फटकेबाजी करण्याचे मन बनवले. नशीबाचीही त्याला साथ मिळाली. हेजलवूनडे टाकलेल्या अप्रतिम बाउन्सर पृथ्वीच्या बॅटची कड घेऊन सीमारेषेपलीकडे गेला. यावर चार धावा मिळाल्या. याच षटकात पृथ्वीनं एक षटकार मारला. त्याच्यानंतर त्याने दीपक चाहरच्या एकाच षटकात चार खणखणीत चौकार लगावले.

loading image
go to top