esakal | IPL 2021 आठवतंय का? सलग 5 पराभवानंतरही MI नं गाठली होती प्ले ऑफ
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Indians

आठवतंय का? सलग 5 पराभवानंतरही MI नं गाठली होती प्ले ऑफ

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक पाच वेळा जेतेपद पटकलेल्या मुंबई इंडियन्सची गाडी पटरीवरुन घसरलीये. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर त्यांच्यासमोर आता प्ले ऑफमध्ये टिकून राहण्याची मोठं आव्हान उभे राहिले आहे. काहींनी तर मुंबई इंडियन्सचा प्रवास संपला असेही ठरवले आहे. मुंबई इंडियन्सला धक्क्यातून सावरायचं माहित आहे. त्यामुळेच अजूनही ते काहीतरी पराक्रम करुन दाखवतील, अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांना असेल.

सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा ज्या अडचणीत सापडला आहे ते पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांना युएईच्या मैदानात रंगलेल्या 2014 च्या हंगामाची आठवणही झाली असेल. त्यावेळीचं गणित यावेळीपेक्षा थोडं उलट होते. देशातील निवडणुंकांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामने युएईच्या मैदानात खेळवण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्सचा संघ युएईच्या मैदानात पाच सामने खेळला. कोलकाता, बंगळुरु, चेन्नई, दिल्ली आणि हैदराबाद यांनी लागोपाठ मुंबई इंडियन्सला पराभवाचे धक्के दिले.

हेही वाचा: "भारतीय क्रिकेटर्स पाकिस्तानला घाबरतात"; अब्दुल रझाक बरळला

सलग पाच पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरेल का? असा प्रश्न उपस्थितीत झाला. त्यावेळीही अनेकांना हे शक्य नाही, असेच म्हटले होते. पण उर्वरित 9 सामन्यातील 7 सामन्यातील विजयासह मुंबई इंडियन्सने 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहत टप्ले ऑफ'मध्ये स्थान पक्के केले होते. एलिमेनेटर सामन्यातील लढतीत चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला पराभूत केले. चेन्नईचा प्रवासही त्यानंतर संपुष्टात आला होता. या हंगामात कोलकाता नाईट रायजडर्सने पंजाब किंग्जला पराभूत करत जेतेपद पटकावले होते.

हेही वाचा: Video: ब्राव्होच्या हातून चेंडू निसटला, हवेत उडाला अन्...

सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित दोन सामने जिंकायचे आहेत. यातील पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर ते हैदराबादशी भिडणार आहेत. मुंबईसोबतच कोलकाता आणि राजस्थान या दोन्ही संघांना 14 गुणांपर्यंत पोहचणे शक्य आहे. मुंबई कमाल करणार की राजस्थान रॉयल खेळी करुन त्यांचे मार्ग बंद करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

loading image
go to top