esakal | Video: ब्राव्होच्या हातून चेंडू निसटला, हवेत उडाला अन्... | IPL 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Bravo-Bizarre-Bowling

व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू...

Video: ब्राव्होच्या हातून चेंडू निसटला, हवेत उडाला अन्...

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 Video CSK vs DC: गुणतालिकेतील अव्वल दोन संघांच्या लढाईत दिल्लीचा संघ चेन्नईवर भारी पडला. गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर CSKच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना केवळ १३६ धावाच करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात दिल्लीच्या संघाने विजय मिळवला. सामना जिंकून दिल्लीचा संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला. पण शेवटच्या षटकात घडलेल्या एका अजब प्रकारामुळे चेन्नईचा अनुभवी गोलंदाज ड्वेन ब्राव्हो मात्र चांगलाच चर्चेत राहिला.

हेही वाचा: "तरच पुढच्या IPL मध्ये दिसेल धोनी"

दिल्लीच्या संघाला विजयासाठी ५ चेंडूत ४ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी ब्राव्होच्या हातून चेंडू सुटला आणि विचित्र पद्धतीने धोनीच्याही पायाखालून पार निघून गेला. धोनीला चेंडूचा अंदाज आला नाही. पण मागे उभा असलेल्या हेजलवूडने तो अडवला. पण क्रिकेटच्या नव्या नियमानुसार तो चेंडू नो बॉल देण्यात आला. पण तो चेंडू पाहून सारेच गोंधळात पडले होते.

पाहा नक्की काय घडलं...

हेही वाचा: Video युजीच्या 'त्या' ओव्हरमध्ये मॅच फिरली!

या प्रकारानंतर जेव्हा हेटमायरला त्या विशिष्ट चेंडूबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा हेटमायर म्हणाला की मलादेखील असं वाटलं होतं की तो चेंडू वाईड असाव. पण नंतर मला असं समजलं की चेंडू पिचच्या बाहेर टप्पा पडल्याने तो नो बॉल देण्यात आला. मी रबाडाला फ्री हिटची कल्पना दिली होती. अखेरीस, रबाडाने चौकार मारून संघाला विजय मिळून दिला.

loading image
go to top