esakal | IPL 2021 KKR vs PBKS: कोलकाता की पंजाब.. कोण भारी? नक्की पाहा आकडेवारी | Cricket
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021: कोलकाता की पंजाब.. कोण भारी? नक्की पाहा आकडेवारी

आजचा सामना जिंकणे पंजाब अन् कोलकाता दोघांसाठीही अत्यावश्यक

IPL 2021: कोलकाता की पंजाब.. कोण भारी? नक्की पाहा आकडेवारी

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 KKR vs PBKS: दुसऱ्या टप्प्यात आज कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाताच्या संघाचा सामना केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स संघाशी होणार आहे. प्ले ऑफ्सच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना सामन्यात विजय मिळवणं अत्यावश्यक आहे. कोलकाताचा संघ सध्या चौथ्या स्थानावर असला तरीही त्यांना ११ पैकी केवळ पाच सामन्यांमध्येच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे पराभूत झाल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात येण्याची भीती आहे. कोलकाताने त्यांचे पुढचे तीनही सामने जिंकले तर त्यांना स्वबळावर प्ले ऑफ्सचे तिकीट मिळवता येऊ शकणार आहे. पंजाब संघाने ११ सामन्यात ४ विजय मिळवले असून ते सहाव्या स्थानी आहेत. त्यांनाही पुढील तीन सामने जिंकणे अनिवार्य आहे. ते पराभूत झाल्यास त्यांचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची भीती आहे. त्यातच पंजाबचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली असल्यामुळे पंजाबपुढे एक वेगळेच आव्हान असणार आहे.

कोलकाता वि. पंजाब... पाहा आकडेवारी

- कोलकाता संघाने आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये पंजाबवर १९ वेळा विजय मिळवला आहे. तर पंजाबच्या संघाला ही किमया केवळ ९ वेळा साधता आली आहे.

- फलंदाजीचा विचार करता आंद्रे रसल हा कोलकाताचा धडाकेबाज खेळाडू आहे. त्याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक २६१ धावा केल्या आहेत. गेल्या सामन्यात तो अनफिट होता. त्यामुळे तो या सामन्यात खेळेल की नाही, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. पंजाब संघाकडून लोकेश राहुल तुफान फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत पंजाब संघात दाखल झाल्यापासून कोलकाताविरूद्ध २५० धावा केल्या आहेत.

- गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास कोलकाताचा सुनील नारायण याने पंजाबला अनेकदा त्रास दिला आहे. त्याच्या नावे पंजाबविरूद्ध एकूण सर्व हंगामात मिळून ३० बळी आहेत. तर पंजाबकडून मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर विशेष लक्ष असणार आहे. त्याने आतापर्यंत कोलकाताविरूद्ध ७ गडी बाद केले आहेत.

loading image
go to top