esakal | IPL 2021: KKRचा शारजावर धमाका; राजस्थानला विजयासाठी १७२ धावांची गरज | Shubman Gill
sakal

बोलून बातमी शोधा

KKRचा शारजावर धमाका; राजस्थानला विजयासाठी १७२ धावांची गरज

सलामीवीर शुबमन गिलने ठोकलं धडाकेबाज अर्धशतक

KKRचा शारजावर धमाका; राजस्थानला विजयासाठी १७२ धावांची गरज

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 KKR vs RR: राजस्थान विरूद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात कोलकाताच्या संघाने धडाकेबाज फलंदाजी केली. शारजाच्या मैदानावर कोलकाताने २० षटकात १७१ धावा कुटल्या आणि राजस्थानला १७२ धावांचे आव्हान दिले. शुबमन गिलने संघाला धडाकेबाज सुरूवात करून दिली. त्याच्या ५६ धावांच्या खेळीमुळे संघाला चांगली सुरूवात मिळाली. तर दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन जोडीने शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करत संघाला १७०पार मजल मारली.

नाणेफेक गमावलेल्या कोलकाता संघाला आजच्या सामन्यात मोठा विजय आवश्यक असताना सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली. शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी तुफान फटकेबाजी केली. अय्यर ३५ चेंडूत ३८ धावा काढून बाद झाला. पण शुबमन गिलने मात्र दमदार अर्धशतक ठोकले. त्याने ४४ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या.

शुबमन गिल झाल्यानंतर नितीश राणाने ५ चेंडूत १२ धावा केल्या. त्यात १ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. पाठोपाठ राहुल त्रिपाठीही १४ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. त्याने ३ चौकार लगावले. अखेर दिनेश कार्तिकने ११ चेंडूत एका षटकारासह नाबाद १३ धावा केल्या तर मॉर्गनने ११ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार लगावत नाबाद १४ धावा केल्या. त्यांच्यामुळे संघाने २० षटकात १७१ धावांपर्यंत मजल मारली. मॉरिस, साकरिया, तेवातिया आणि फिलिप चौघांनी प्रत्येकी १-१ बळी टिपला.

loading image
go to top