esakal | IPL 2021: मुंबईला 'दिल्ली' जिंकावीच लागेल! पाहा आकडेवारी | MI vs DC
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021: मुंबईला 'दिल्ली' जिंकावीच लागेल! पाहा आकडेवारी

दिल्लीचा संघ आधीच 'प्ले-ऑफ्स'मध्ये; मुंबईच्या कामगिरीवर लक्ष

IPL 2021: मुंबईला 'दिल्ली' जिंकावीच लागेल! पाहा आकडेवारी

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 MI vs DC: मुंबई इंडियन्स विरूद्ध आज दुपारच्या वेळेत दिल्ली कॅपिटल्सचा सामना रंगणार आहे. काल झालेल्या सामन्यात पंजाबने कोलकाताचा पराभव केल्यामुळे दिल्लीचा संघ आपोआपच प्ले-ऑफ्ससाठी पात्र ठरला. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला तर त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही. पण, मुंबईच्या संघाला या सामन्यात विजय अत्यावश्यक आहे. आजचा सामना मुंबईने गमावला तर त्यांच्यासाठी प्ले-ऑफ्सची गणितं अधिकच कठीण होऊन बसतील. या पार्श्वभूमीवर पाहूया दिल्ली आणि मुंबई या दोन संघांबद्दलची रोचक आकडेवारी-

हेही वाचा: MI vs DC, Dream11 Fantasy Tips : रोहितपेक्षा धवन ठरु शकतो भारी!

  • सध्या दिल्लीचा संघ १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर मुंबईचा संघ १० गुणांसह पाचव्या स्थानी आहे.

  • मुंबईने गेल्या सामन्यात पंजाबच्या संघाला पराभूत केले होते. हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड या दोन खेळाडूंना मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला होता.

  • दिल्लीच्या संघाला गेल्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. दिल्लीला कोलकाता संघाने सहज मात दिली होती.

  • मुंबई आणि दिल्ली या दोन संघांंमध्ये आतापर्यंत २९ सामने झाले आहेत. यातील १६ सामने मुंबईने तर १० सामने दिल्लीने जिंकले आहेत. तीन सामने काही कारणास्तव रद्द झाले होते.

Rohit-Sharma-Rishabh-Pant

Rohit-Sharma-Rishabh-Pant

  • आज ज्या शारजाच्या मैदानावर हा सामना होणार आहे, तेथे या आधी हे दोन संघ एकदा आमनेसामने आले होते. त्यावेळी मुंबईने तो सामना जिंकला होता.

  • दिल्ली विरूद्ध मुंबई यांच्या शेवटच्या ५ सामन्यांची आकडेवारी पाहता मुंबईने ४ सामने जिंकले आहेत तर दिल्ली केवळ १ सामन्यात विजय मिळवता आला आहे.

  • दिल्लीने आतापर्यंत मुंबईविरूद्ध खेळताना प्रथम फलंदाजी करत ५ वेळा सामना जिंकला आहे तर आव्हानाचा पाठलाग करताना ८ वेळा सामन्यात विजय मिळवला आहे.

  • मुंबईच्या संघाने आतापर्यंत दिल्लीविरूद्ध खेळत असताना प्रथम फलंदाजी करत ११ वेळा सामना जिंकला आहे तर आव्हानाचा पाठलाग करताना ५ वेळा सामन्यात विजय मिळवला आहे.

loading image
go to top