IPL 2021, MI vs PBKS : मुंबईकराची खिलाडूवृत्ती! राहुलला आधी आउट केलं अन् खेळ म्हणाला...Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MI vs PBKS

Video : मुंबईकराची खिलाडूवृत्ती! राहुलला आधी आउट केलं अन् खेळ म्हणाला...

IPL 2021, MI vs PBKS : पंजाब किंग्ज विरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा ट्रॅकवर आले आहे. क्रुणाल पांड्यानं पंजाबला मनदीपच्या रुपात पहिला धक्का दिला. त्यानंतर मैदानात आलेला गेलही स्वस्तात माघारी फिरला. पंजाबच्या डावातील 6 व्या षटकात गेलनं मारलेला फटका नॉन स्ट्राईकला असलेल्या लोकेश राहुलच्या शरीरावर लागून गोलंदाजी करणाऱ्या क्रुणाल पांड्याच्या हातामध्ये आला. आणि क्रुणालने दांड्या उडवत रन आउटची अपील केली.

मैदानातील पंचांनी या निर्णयासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचा इशारा केला. पण त्यानंतर खिलाडूवृत्ती दाखवत क्रृणाल पांड्याने माघार घेत लोकेश राहुलला खेळायला सांगितले. या कृतीने मुंबईकर क्रुणाल पांड्याने खिलाडूवृत्तीच दर्शनच घडवून आणले. रिप्लायमध्ये केएल राहुल क्रिजबाहेर होता हे स्पष्ट दिसत होते. ही विकेट महागडी ठरु शकते हे माहित असताना मुंबई इंडियन्सने त्याला पुढे खेळण्याची संधी दिली.

हेही वाचा: IPL 2021 Video: KKRचा दिल्लीवर विजय; सुनील नारायण सामनावीर

लोकेश राहुल या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरला. पोलार्डच्या गोलंदाजीवर बुमराहने त्याचा झेल घेतला. याच षटकात पोलार्डने गेललाही माघारी धाडले होता. मोठा फटका मारण्याच्या नादात तो सीमारेषेवर हार्दिक पांड्याच्या हाती झेल देऊन परतला. लोकेश राहुलने 22 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने 21 धावांची खेळी केली.

हेही वाचा: DC vs KKR : पंतनं मोडला सेहवागचा मोठा विक्रम

स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी घेतली. त्याचा हा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले. पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांनी 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत प्रत्येकी 8-8 गुणासंह ते अनुक्रमे पाचव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. हा सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत. यात पंजाब किंग्जला बॅकफूटवर ढकलत मुंबई इंडियन्सने सुरुवातीला आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

loading image
go to top