esakal | IPL Against RR ट्रेंडिगमागची गंमत; फ्रेंचायझीनही दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

IPL Against RR

IPL Against RR ट्रेंडिगमागची गंमत; फ्रेंचायझीनही दिलं उत्तर

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021, MI vs RR : शारजाच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रायल्स यांच्यात प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी लढत रंगली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय सार्थ ठरवत अवघ्या 50 धावांत राजस्थानचा निम्मा संघ तंबूत धाडला.

शारजाच्या मैदानात ही लढत सुरु असताना ट्विटरवर राजस्थान रॉयल्स ट्रेंडिगमध्ये दिसले. #IPLAgainstRR हा हॅश टॅग ट्रेंडिगमध्ये आला. अनेकांना राजस्‍थानच्या संघावर बॅन घातला गेला की काय? असा प्रश्न पडला. पण असं काहीच झालेल नाही. एका नेटकऱ्याने मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात केरॉन पोलार्डच्या कामगिरीसंदर्भात एक ट्विट केले होते. पोलार्डने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात नाबाद 87 धावाची सर्वोच्च खेळी केली आहे, असा उल्लेख असणारे ट्विट केले होते. ‘Kieron Pollard Registered his Highest Score of 87 in IPL against RR’ असे इंग्रजीत केलेल्या ट्विटमधील IPL against RR हा हॅशटॅग तयार झाला.

हेही वाचा: आठवतंय का? सलग 5 पराभवानंतरही MI नं गाठली होती प्ले ऑफ

IPL Against RR या हॅशटॅगच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये येण्यामागे ट्विटरचीही चूक आहे. त्यांनी कोणताही विचार न करता हे शब्द ट्रेंडमध्ये टाकले. राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भात मजेशीर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. कर्णधार संजू सॅमसनचा निवांत बसलेला व्हिडिओ शेअर करत राजस्थानच्या संघाने IPL Against RR हा हॅशटॅग वापरला आहे.

loading image
go to top