esakal | MI vs SRH : 'सूर्या'चाही किरणोत्सोव... | Video
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar Yadav

MI vs SRH : 'सूर्या'चाही किरणोत्सोव... Video

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021, MI vs SRH : प्ले ऑफमध्ये जाण्याची धडपड काय असते, याची झलक मुंबई इंडियन्सने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात दाखवून दिली. मोठी धावसंख्या उभारुन हैदराबादला लवकरात लवकर आटोपले तरच त्यांना प्ले ऑफच तिकीट मिळणार हे पक्के होते. त्यामुळे फलंदाजी घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सने सुरुवातीपासून आक्रमक खेळ दाखवला. इशान किशन आपल्या चौफेर फटकेबाजीनं चाहत्यांच्या डोळ्याचे पारणं फेडल्यानंतर सूर्याने त्याची जागा घेतली.

यंदाच्या हंगामात संघर्ष करत असलेल्या सूर्यकुमारने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतक नोंदवले. त्याने 40 चेंडूत 82 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने आपल्या या धमाकेदार खेळीत 13 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार खेचले. 205 च्या स्ट्राईकने धावा करत त्याने मुंबईच्या धावफलक 200 पार नेला. मुंबई इंडियन्सला याचा प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी किती फायदा होईल. यापेक्षाही सूर्याची ही खेळी आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण ठरले. तो पुन्हा एकदा आपल्या जुन्या तेवरमध्ये दिसणे टी-20 वर्ल्ड कपसाठी महत्त्वाचे होते.

यंदाच्या हंगामातील सुर्यकुमार यादवचे हे दुसरे तर युएईमधील पहिलेचं अर्धशतक आहे. 14 सामन्यात त्याने 317 धावा केल्या असून सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात केलेली 82 धावांची खेळी ही त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोच्च खेळी ठरली आहे. मुंबई इंडियन्सने केलेल्या 235 धावांत इशान किशन आणि सुर्यकुमार यादव या दोघांनी 12 ओव्हर्समध्ये 166 धावा कुटल्या. यात 24 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश आहे. याशिवाय 8 ओव्हर्समध्ये 58 धावा केल्या.

loading image
go to top