esakal | IPL 2021: विजयानंतर मुंबईचा 'हिटमॅन' काय म्हणाला, वाचा... | Rohit Sharma
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Sharma-Win

मुंबईने ६ गडी राखून पंजाबवर मिळवला थरारक विजय

IPL 2021: विजयानंतर मुंबईचा 'हिटमॅन' काय म्हणाला, वाचा...

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 MI vs PBKS: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने मंगळवारी अखेर स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला विजय मिळवला. केएल राहुलच्या पंजाब संघाला पराभूत करत मुंबईने विजयी पुनरागमन केले. पंजाबकडून एडन मार्क्रमने सर्वाधिक ४२ धावा करत संघाला १३५ पर्यंत मजल मारून दिली. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने १ षटक आणि ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर मुंबईचा हिटमॅन रोहित शर्मा याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

"आजचा सामना आम्ही जिंकलो याचा आनंद आहे. पण आम्ही संघ म्हणून आमचा सर्वोत्तम खेळ केलेला नाही. जेव्हा स्पर्धा अटीतटीची असते, तेव्हा अशा गोष्टी होत असतात. संघ पराभूत होत असतो तेव्हा सर्वांनी एकत्र राहून एकमेकांना धीर देणं गरजेचं असतं. पण ही स्पर्धा खूप वेळ सुरू असते. करो या मरोच्या परिस्थितीत आमचा संघ अनेकदा आलेला आहे. त्यामुळे आम्ही विश्वास हारलेलो नाही. आमच्या संघातील सर्वच खेळाडू धडाकेबाज टक्कर द्यायला तयार आहेत", असे रोहित म्हणाला.

हार्दिकच्या फलंदाजीचं कौतुक करायलाच हवं. त्याला सामन्याचा वेग आणि मूड नीट कळतो. कोणत्या परिस्थितीत कसं खेळावं याची त्याला समज आहे. हे आमच्या संघासाठी आणि त्याच्यासाठी चांगले ठरते. फक्त त्याला थोडा वेळ द्यायला हवा. एकदा तो सेट झाला तो गोलंदाजांवर सत्ता गाजवतो. इशान किशनला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेणं खूप कठीण होतं. सौरभ तिवारीचा खेळ चांगला आहे. चेन्नईविरूद्ध त्याने अर्धशतक ठोकलं होतं. त्याच्यासारखाच फलंदाज आम्हाला सामन्यात हवा होता. मी कोणालाही संघातून बाहेर ठेवलं जाण्याबद्दल बोलत नाही. इशान लवकरच पुन्हा संघात दिसेल. पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जायलाच हवेत", असं रोहितने स्पष्टपणे सांगितलं.

loading image
go to top