esakal | Video युजीच्या 'त्या' ओव्हरमध्ये मॅच फिरली!
sakal

बोलून बातमी शोधा

Video युजीच्या 'त्या' ओव्हरमध्ये मॅच फिरली!

Video युजीच्या 'त्या' ओव्हरमध्ये मॅच फिरली!

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएलच्या 14 व्या हंगामात 14 गुणांपर्यंत पोहचून प्ले ऑफच्या आशा पल्लवित ठेवण्याचे पंजाब किंग्जचे इरादे गळून पडले. रॉयल चॅलेंजर्सं पंजाबविरुद्धच्या विजयानंतर प्ले ऑफमध्ये पोहचणारी तिसरी टीम ठरली. दुसरीकडे पंजाबच्या अडचणी वाढल्या आहेत. अधिकृतरित्या पंजाब अद्याप स्पर्धेबाहेर पडले नसले तरी आता त्यांचं स्पर्धेतील भवितव्य 'जर-तर'च्या समीकरणात जाऊन पडले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात गोलंदाजांनी विशेष छाप सोडली. पहिल्यांदा पंजाबच्या गोलंदाजीवेळी क्रिस्टनने एका षटकात दोन विकेट घेत पंजाबला मॅचमध्ये आणले. त्यानंतर मोहम्मद शमीनेही एकाच षटकात तीन विकेट घेत बंगळुरुला माफक धावात रोखलं. दुसरीकडे युजवेंद्र चहलनं पंजाबच्या डावातील 16 व्या षटकात 2 विकेट घेतल्या. ही ओव्हरचा पंजाबसाठी डोकेदुखी ठरली.

हेही वाचा: PBKS साठी सोळावं षटक ठरलं धोक्याच; RCB प्ले ऑफमध्ये

रॉयल चॅलेंजर्सच्या तुलनेत पंजाबने धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली होती. लोकेश राहुल आणि मयांक यांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. पण या दोघांशिवाय अन्य कोणालाही नावाला साजेसा खेळ करता आला नाही. जोपर्यंत मयंक अग्रवाल क्रिजमध्ये होतो तोपर्यंत पंजाबचा संघ फ्रंटफूटवर होता. युजी आपल्या कोट्यातील अखेरच्या षटकात सामना बंगळुरुच्या बाजूनं वळवला.

हेही वाचा: 'बॅट नॉट इनवॉल्व ठिकये'; पण बॉल ग्लोव्जला लागला त्याच काय?

पंजाबच्या डावातील 16 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मयांक मोठा फटका मारण्याच्या नादात सिराजच्या हाती झेल देऊन परतला. मार्करने तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने सिंगल धाव काढली. पाचव्या चेंडूवर चहलनं सरफराज खानला अप्रतिमरित्या बोल्ड केल. या दोन विकेट्समुळे सामना फिरला. युजीनं आपल्या पहिल्या षटकात 7 आणि दुसऱ्या षटकात 9 धावा तर तिसऱ्या षटकात त्याने 6 धावा खर्च केल्या होत्या.

loading image
go to top