esakal | IPL 2021 : PBKS साठी सोळावं षटक ठरलं धोक्याच; RCB प्ले ऑफमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

PBKS साठी सोळावं षटक ठरलं धोक्याच; RCB प्ले ऑफमध्ये

PBKS साठी सोळावं षटक ठरलं धोक्याच; RCB प्ले ऑफमध्ये

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021, RCB vs PBKS Match Updates : युजवेंद्र चहलनं एकाच षटकात घेतलेल्या दोनन विकेटच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुन पंजाब किंग्जला पराभूत करत प्ले ऑफ गाठली आहे. दुसरीकडे पंजाबचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पंजाबला 6 धावांनी पराभूत करत बंगळुरुनं दोन गुणासह एकूण 16 गुणांची कमाई करत प्ले ऑपमधील स्थान पक्के केले. प्ले ऑफमधील तीन संघ पक्के झाले असून आता केवळ चौथा संघ कोणता याची प्रतिक्षा आहे.

बंगळुरुच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने दमदार सुरुवात केली. लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. लोकेश राहुल तंबूत परतल्यानंतर निकोलस पूरन (3) स्वस्तात माघारी फिरला. मयांक अग्रवालने अर्धशतक पूर्ण केले. त्याला मार्करमही उत्तम साथ देत होता. पण डावातील 16 व्या षटकात पंजाबचं गणित बिघडले. युजवेंद्र चहलने मयांक अग्रवालला 57 धावांवर बाद केले. याच षटकात चहलने सरफराज खान आणि त्यानंतर मार्करमची (20) विकेट घेतील. यातून पंजाबला सावरता आले नाही. मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला शाहरुख खान अखेरच्या षटकात धावबाद झाला. आणि सामना पूर्णपणे बंगळुरुच्या बाजूनं वळला. निर्धारित 20 षटकात 6 बाद 158 धावांपर्यंत मजल मारता आली.

हेही वाचा: 'बॅट नॉट इनवॉल्व ठिकये'; पण बॉल ग्लोव्जला लागला त्याच काय?

मॅक्सवेलच्या जबरदस्त अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पंजाबसमोर 165 धावांचे आव्हान ठेवले होते. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागादारी रचली. हॅन्रिक्सने कोहलीला बोल्ड करत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या डॅनियल क्रिस्टनला हॅन्रिक्सनं खातेही उघडू दिले नाही. आपल्या दुसऱ्या षटकात देवदत्त पडिक्कलला 40 धावांवर बाद करत हॅन्रिक्समुळे पंजाबच्या संघाने कमबॅक केले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने 3 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 33 चेंडूत 57 धावांची खेळी केली. शमीने अखेरच्या षटकात मॅक्सवेलसह शहाबाज आणि गार्डनरला बाद करत बंगळुरुच्या संघाला निर्धारित 20 षटकात 7 बाद 164 धावांत रोखलं.

हेही वाचा: IPL 2021: जड्डूचा सिक्सर अन् ऋतूराजची तलवारबाजी; व्हिडिओ व्हायरल

146-6 : शाहरुख खान रन आउट

127-5 : जॉर्ज गार्टननं मार्करमच्या रुपात पंजाबला दिला आणखी एक धक्का

121-4 : चहलनं टाकलेलं 16 षटक पंजाबसाठी धोक्याच, सरफराज खानच्या रुपात संघाला आणखी एक धक्का

114-3 : मयंक अग्रवालच्या रुपात चहलला मोठं यश, मयांकनं 42 चेंडूत 57 धावांची खेळी केली.

99-2 : निकोलस पूरन स्वस्तात परतला, चहलने घेतली विकेट

91-1 : लोकेश राहुलच्या रुपात पंजाबला पहिला धक्का, त्याने 35 चेंडूत 39 धावांची खेळी केली

पंजाब किंग्जसमोर 165 धावांचे लक्ष्य

163-7 : शमीन अखेरच्या षटकात तीन विकेट घेतल्या. त्याने गार्टनला खातेही उघडू दिले नाही.

163-6 : मोहम्मद शमीला षटकार खेचून शहाबाज अहमद तंबूत परतला

157-5 : शमीनं ग्लॅन मॅक्सवेलच्या खेळीला लावला ब्रेक, त्याने 57 धावांची खेळी करत आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पाचवे अर्धशतक पूर्ण केलं

146-4 : सरफराज खानचे सर्वोत्तम क्षेत्ररक्षण, एबी डिव्हिलियर्सला 23 धावांवर केलं धावबाद

73-3 : हॅन्रिकला आणखी एक यश, देवदत्त पडिक्कल 38 चेंडूत 40 धावा करुन माघारी

68-2 : क्रिस्टन आल्यापावली माघारी, हॅन्रिक्सनं सलग दुसऱ्या चेंडूवर मिळवले दुसरं यश

68-1 : हॅन्रिक्सनं विराट कोहलीच्या रुपात पंजांबला मिळवून दिलं मोठ यश, कोहलीनं 24 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 25 धावा केल्या

विराट कोहली देवदत्त पडिक्कलने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली

bfअसे आहेत दोन्ही संघ

देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), श्रीकर भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, जॉर्ज गॅरटोन, शहाबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.

लोकेश राहुल (कर्णधार/यष्टिरक्षक), मयांक अग्रवाल, एडन मार्करम, निकोलस पूरन, सरफराज खान, शाहरुख खान, हॅन्रिक्स, हरमनप्रित ब्रार, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

loading image
go to top