esakal | IPL 2021, MI vs RR : मुंबई इंडियन्सचा (ई) शानदार विजय
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा (ई) शानदार विजय

IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा (ई) शानदार विजय

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021, MI vs RR : इशान किशनने 25 चेंडूत झळकवलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 70 चेंडू आणि 8 विकेट राखून राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवला. मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयामुळे मुंबई इंडियन्सला आवश्यक असणाऱ्या नेट रनरेटमध्येही सुधारणा झालीये. माफक धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशनने डावाला सुरुवात केली. रोहित शर्मा 13 चेंडूत 22 धावा करुन बाद झाला. चेतन सकारियाने त्याला बाद केले. सुर्यकुमार यादव 8 चेंडूत 13 धावा करुन परतला. ईशान किशनने 25 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या.

नॅथन कुल्टर नीलने घेतलेल्या 4 विकेट आणि त्याला नीशम-बुमराह यांनी दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने राजस्थानला अवघ्या 90 धावांवर रोखले होते. राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 9 बाद 90 धावा केल्या. एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने राजस्थानच्या डावाला आक्रमक सुरुवात केली. पण यशस्वी जयस्वालच्या रुपात नॅथन कुल्टर नीलने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. जयस्वालने 9 चेंडूत 12 धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ धावफलकावर 41 धावा असताना बुमराहने लुईसला बाद केले. त्याने राजस्थानकडून सर्वाधिक 19 चेंडूत 24 धावांची खेळी केली. त्यानंतर अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही.

प्ले ऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स शारजाच्या मैदानात उतरले होते. मुंबई इंडियन्सने या सामन्यातील विजयासह स्पर्धेतील आपल्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. आता ज्या राजस्थानला हरवले त्यांनी कोलकाताला हरवण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. याशिवाय सनरायझर्स विरुद्धचा सामनाही जिंकावा लागणार आहे. मुंबई इंडियन्सकडून नॅथन कुल्टर नीलने 4, नीशमने 3 तर बुमराहने दोन विकेट घेतल्या.

56-2 : मुस्तफिझुर रहमानने सुर्यकुमार यादवच्या रुपात संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्याने 8 चेंडूत 13 धावांची खेळी केली.

23-1 : चेतन सकारियाने रोहितच्या रुपात मुंबई इंडियन्सला दिला पहिला धक्का, त्याने 13 चेंडूत 22 धावा केल्या.

राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 9 बाद 90 धावा केल्या

82-9 : नॅथन कुल्टर नीलने चेतन साकारियाच्या रुपात घेतले सामन्यातील चौथे यश

76-8 : डेविड मिलर 15 धावा काढून माघारी, नॅथन कुल्टर नीलला मिळाले यश

74-7 : बुमराहने श्रेयस गोपाळला खातेही उघडू दिले नाही.

71-6 : राहुल तेवतियाही स्वस्तात माघारी, निशमच्या खात्यात आणखी एक विकेट

50-5 : कुल्टन नीलला आणखी एक यश, ग्लेन फिलिप्स 4 धावा करुन माघारी

48-4 : जेम्स निशमनं शिवम दुबेलाही धाडले तंबूत, या सामन्यातील त्याचे हे दुसरे यश आहे.

41-3 : नीशमन घेतली संजू सॅमसनची विकेट, तो अवघ्या तीन धावा करुन जयंत यादवकडे झेल देऊन परतला

41-2 : बुमराहनं एविन लुईसला धाडले तंबूत, त्याने 19 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 29 धावा केल्या.

27-1 : कुल्टन नीलनं फोडली सलामीची जोडी, यशस्वी जयस्वाल 9 चेंडूत 12 धावा करुन तंबूत

राजस्थानकडून लुईस-यशस्वी जयस्वालन केली डावाची सुरुवात, मुंबईकडून बोल्टचं आक्रमण

असे आहेत दोन्ही संघ

Rajasthan Royals (Playing XI): एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), शिवम दुबे, ग्लेन फिलिप्स, डेविड मिलर, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, कुलदीप यादव, मुस्तफिझुर रहमान, चेतन सकारिया.

Mumbai Indians (Playing XI): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सुर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, केरॉन पोलार्ड, जेम्स निशम, नॅथन कुल्टर नील, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ड.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला, पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय

loading image
go to top