IPL 2021 Points Table: दिल्लीकर पुन्हा अव्वल; हैदराबाद तळाशीच

DC-vs-SRH
DC-vs-SRH
Summary

DC vs SRH: नॉर्टजे, रबाडाचा भेदक मारा; धवन, अय्यर अन् पंतची फटकेबाजी

IPL 2021 DC vs SRH: गुणतक्त्यात तळाला असलेल्या सनरायझर्स हैदराबादला दिल्लीविरूद्धच्या सामन्यात एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकात १३४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाने १८व्या षटकातच सहज विजय मिळवला. या पराभवानंतर हैदराबादची प्ले ऑफ्सची वाट अधिकच खडतर झाली. तर, दिल्लीचा संघ पुन्हा एकदा अव्वलस्थानी विराजमान झाला.

पाहा Points Table:

DC-vs-SRH
IPL 2021: गब्बरनं मोडला कोहली-रोहितचा रेकॉर्ड

हैदराबादच्या संघाने दिल्लीला १३५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि शिखर धवन जोडीने फटकेबाजी केली. धवन ३७ चेंडूत ४२ धावा काढून बाद झाला. अखेर कर्णधार ऋषभ पंतच्या जोडीने श्रेयस अय्यरने संघाला विजय मिळवून दिला. अय्यरने ४१ चेंडूत नाबाद ४७ धावा केल्या. तर पंतने २१ चेंडूत नाबाद ३५ धावा कुटल्या.

DC-vs-SRH
IPL 2021: "लाज वाटते"; SRHच्या पराभवानंतर विल्यमसन हवालदिल

तत्पूर्वी, दिल्लीच्या संघाने प्रथम गोलंदाजी करत भेदक मारा केला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर शून्यावर परतला. वृद्धीमान साहा आणि केन विल्यमसन दोघांनीही प्रत्येकी १८ धावा केल्या. ते दोघे बाद झाल्यावर मनिष पांडे १७ तर केदार जाधव ३ धावांवर तंबूत गेला. अष्टपैलू जेसन होल्डरही १० धावांवर माघारी परतला. शेवटच्या टप्प्यात अब्दुल समदच्या २१ चेंडूत २८ धावा आणि राशिद खानच्या १९ चेंडूत २२ धावांच्या जोरावर हैदराबादने २० षटकात १३४ धावा केल्या. दिल्लीकडून रबाडाने ३ तर नॉर्टजे आणि अक्सर पटेलने २-२ बळी टिपले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com