IPL 2021: "लाज वाटते"; SRHच्या पराभवानंतर विल्यमसन हवालदिल

Kane-Williamson-SRH
Kane-Williamson-SRH
Summary

दिल्लीने हैदराबादला अतिशय सहज केलं पराभूत

IPL 2021 DC vs SRH: गुणतक्त्यात तळाला असलेल्या सनरायझर्स हैदराबादला दिल्लीविरूद्धच्या सामन्यात एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकात १३४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाने १८व्या षटकातच सहज विजय मिळवला. या पराभवानंतर हैदराबादची प्ले ऑफ्सची वाट अधिकच खडतर झाली. त्यानंतर हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने भावनिक प्रतिक्रिया दिली.

Kane-Williamson-SRH
IPL 2021: राजस्थानच्या 'यंग ब्रिगेड'चा भन्नाट डान्स (Video)

"आमच्या संघाला अपेक्षित सुरूवात मिळाली नाही. डावाच्या शेवटी फलंदाजांनी काहीसा संघर्ष केला. पण तरीही आमच्या २५ ते ३० धावा कमीच झाल्या. ही आमच्यासाठी शरमेची गोष्ट आहे. असे असले तरी आम्ही हिंमत हारलो नाही ही सकारात्मक बाब होती. आमच्या संघासाठी सध्याचा काळ काहीसा कठीण आहे. पण आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. आमचा संघ कोणालाही पराभूत करण्यासाठी सक्षम आहे. हळूहळू आमच्या संघाच्या कामगिरीत सुधारणा होत आहे. आम्ही नक्कीच पुनरागमन करू", असा विश्वास विल्यमसनने व्यक्त केला.

Kane-Williamson-SRH
IPL 2021 DC vs SRH : पंत-अय्यरचा फिनिशिंग टच; दिल्लीनं घेतली चेन्नईची जागा

दरम्यान, हैदराबादच्या संघाने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन याने ३७ चेंडूत ४२ धावा केल्या. त्याला, श्रेयस अय्यरची साथ लाभली. त्याने २ चौकार आणि २ षटकार लगावत नाबाद ४७ धावा केल्या. दुसरीकडे कर्णधार ऋषभ पंतने २१ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ३५ धावां केल्या. या विजयासह दिल्लीने गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com