esakal | IPL 2021: विराटच्या RCB चा पराभव झाल्यानंतर 'असं' आहे Points Table!
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021: RCB चा पराभव झाल्यानंतर 'असं' आहे Points Table!

कोलकाताच्या संघाने बंगळुरूचा केला एकतर्फी पराभव

IPL 2021: RCB चा पराभव झाल्यानंतर 'असं' आहे Points Table!

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 KKR vs RCB: विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) १० षटके आणि ९ गडी राखून पराभूत केले. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना १९ षटकात केवळ ९२ धावा केल्या. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स यांसारखे बडे खेळाडू स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कोलकाताच्या संघाने केवळ एका गड्याच्या मोबदल्यात हा सामना खिशात घातला. या विजयामुळे IPL 2021 Points Table मध्ये फारसा फरक पडला नाही, पण कोलकाताला महत्त्वाचे दोन गुण मिळाले.

हेही वाचा: Video : आंद्रे रसेलनं घेतला बदला; AB च्या नावे नकोसा विक्रम

IPL 2021 गुणतक्ता (Points Table)

संघ - सामने - विजय - गुण

चेन्नई - ८ - ६ - १२

दिल्ली - ८ - ६ - १२

बंगळुरू - ८ - ५ - १०

मुंबई - ८ - ४ - ०८

कोलकाता - ८ - ३ - ०६

राजस्थान - ७ - ३ - ०६

पंजाब - ८ - ३ - ०६

हैदराबाद - ७ - १ - ०२

हेही वाचा: IPL 2021 : युवा पोरानं विराटला गंडवलं; व्हिडिओ एकदा बघाच

दरम्यान, प्ले ऑफ्समधील आपले स्थान कायम ठेवण्यासाठी कोलकाताला विजय महत्त्वाचा होता. पहिल्यांदा कोलकाताच्या गोलंदाजांनी बंगळुरूच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. तर नंतर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यरने या कोलकाताच्या सलामीवीरांनी त्यांच्या गोलंदाजांनाही धूळ चारली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी ८२ धावांची भागीदारी केली. शुभमन गिल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला. त्याचे अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकले. पण व्यंकटनेश अय्यरने संघाला विजय मिळवून दिला.

loading image
go to top