esakal | IPL 2021 Points Table : MI नं KKR शी बरोबरी तर केली, पण.. |MI vs RR
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Indians

IPL 2021 Points Table : MI नं KKR शी बरोबरी तर केली, पण..

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 Points Table : आयपीएलच्या 14 व्या हंगामात प्ले ऑफमधील 3 संघ मिळाले असून चौथ्या संघाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. मुंबई इंडियन्सने राजस्थानला मोठ्या फरकाने पराभूत करत नेट रनरेटमध्ये सुधारणा केली. असली तरी ते अजूनही निगेटिव्ह चिन्हासह कोलकाता नाईट रायडर्सच्या खालोखाल आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने 13 पैकी 6 सामन्यातील विजयासह 12 गुण मिळवले असून +0.29 नेट रनरेटसह ते चौथ्या स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्स 13 पैकी 6 सामन्यातील विजयासह 12 गुण मिळवत -+-0.05 नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर आहेत. प्ले ऑफमधील चौथ्या स्थानासाठीच्या शर्यतीत कोलकाता अजूनही मुंबईच्या एक पाउल पुढे आहे.

तीन संघात पहिल्या दोनसाठी स्पर्धा

प्ले ऑफमध्ये ज्या तीन संघांनी स्थान पक्के केले आहे, त्यातील पहिल्या दोनमध्ये कोणता संघ राहणार हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्याच्या घडीला दिल्ली कॅपिटल्सचा संघ 13 पैकी 10 सामन्यातील विजयासह 20 गुण मिळवून +0.53 नेट रनरेटसह अव्वलस्थानी आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा संघ 13 पैकी 9 सामन्यातील विजयासह +074 नेट रनरेटसह 18 गुण मिळवत दुसऱ्या स्थानावर असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 12 पैकी 6 सामन्यातील विजयासह 16 गुण मिळवत तिसऱ्या स्थानावर आहे. बंगळुरुला आणखी दोन सामने खेळायचे असून सलग दोन विजयासह ते देखील 20 गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर विराजमान होण्यासाठी प्रयत्नशील असतील. जे संघ पहिल्या दोनमध्ये असतात त्याच्यासाठी फायनल खेळण्याची एख अगाउ संधी निर्माण होते. त्यामुळे पहिल्या दोनमध्ये कोण असणार हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण ठरेल.

हेही वाचा: IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा (ई) शानदार विजय

चौथ्या संघासाठी कोलकाता प्रबळ दावेदार

7 आक्टोबरला कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. कोलकाताने या सामन्यात बाजी मारली तर त्यांच्या खात्यात 14 गुण जमा होतील. नेट रनरेट उत्तम असल्यामुळे त्यांची संधीही वाढेल. दुसरीकडे मुंबई इंडियन्सची साखळी सामन्यातील शेवटची लढत सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना जिंकून त्यांना आता 14 गुणांपर्यंत पोहचता येईल. या सामन्यानंतर चौथा संघ कोणता हे चित्र स्पष्ट होईल. पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स संघ आपल्या 13 लढती खेळल्यानंतर अनुक्रमे सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत.

loading image
go to top