esakal | IPL 2021 Qualifier 2: DC vs KKR सामन्यात 'हा' खेळाडू ठरू शकतो 'गेमचेंजर'!
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi-Capitals

फायनलच्या तिकिटासाठी आज दिल्ली विरूद्ध कोलकाता रंगणार सामना

DC vs KKR सामन्यात 'हा' खेळाडू ठरू शकतो 'गेमचेंजर'

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 DC vs KKR: स्पर्धेत आज Qualifier 2 साठीचा सामना रंगणार आहे. प्ले ऑफच्या फेरीतील हा महत्त्वाचा सामना आहे. पहिल्या सामन्यात दिल्लीचा संघ चेन्नईकडून पराभूत झाला, पण साखळी फेरीतील कामगिरीच्या जोरावर त्यांना आणखी एक संधी मिळाली आहे. त्यामुळे बंगळुरूविरूद्ध विजय मिळवणाऱ्या कोलकाता संघाशी त्यांचा आज सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट चेन्नईविरूद्ध अंतिम फेरीत धडक मारणार आहे. या सामन्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच विंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा याने या सामन्यातील गेमचेंजर खेळाडूचे नाव सांगितलं आहे.

हेही वाचा: 'ग्लॅमरस IPL' ... मॅचपेक्षाही 'या' तरूणींच्या अदांचीच चर्चा!

आतापर्यंत हंगामात कगिसो रबाडाने १३ गडी बाद केले आहेत पण दिल्लीच्या शेवटच्या चार सामन्यांमध्ये त्याला एकही गडी बाद करता आलेला नाही. त्यामुळे रबाडाचा फॉर्म ही दिल्ली संघासाठी चिंतेची बाब आहे. तो अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. दिल्लीला प्ले ऑफ फेरीत पोहोचवण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. त्याच्याकडे मधल्या षटकांमध्ये धावा रोखण्याची आणि गडी बाद करण्याची कला आहे. तो शेवटच्या टप्प्यात संथ गतीच्या गोलंदाजीवर बळी मिळवण्यातही पटाईत आहे. गेले काही सामने त्याला ते जमलं नाही हे खरं आहे. तुमच्या संघातील ऑन्रिक नॉर्टजे चांगली गोलंदाजी करत आहे. अशा वेळी रबाडाने जर चांगल्या लयीत परतून दमदार गोलंदाजी केली तर त्याचा नक्कीच संघाला फायदा होईल", असं ब्रायन लारा म्हणाला.

हेही वाचा: IPL 2021: कामगिरी CSKच्या ऋतुराजची, शुभेच्छा मात्र सायलीला

रबाडाला गोलंदाजी नाकारल्याने पंतवर टीकेचा भडीमार

दिल्ली विरूद्ध झालेल्या सामन्यात CSK ला शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. फारसा चांगल्या फॉर्मात नसलेला धोनी मैदानात फलंदाजी करत होता. त्यावेळी रबाडाच्या जागी ऋषभ पंतने शेवटचे षटक टॉम करनला दिले. सामन्यात दडपणाची परिस्थिती निर्माण झाल्यास रबाडाची कामगिरी इतर गोलंदाजांपेक्षा खूप जास्त चांगली असते. त्याने वेळोवेळी ते सिद्ध केले आहे. असं असतानाही त्याला गोलंदाजी न देता कमी अनुभवी असलेल्या टॉम करनला गोलंदाजी दिल्याने पंतवर टीकेचा भडीमार झाला होता.

loading image
go to top