IPL 2021 : CSK च्या मॅचपूर्वी मांजरेकरांचं जाडेजासंदर्भात मोठं वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Jadeja

IPL 2021 : CSK च्या मॅचपूर्वी मांजरेकरांचं जाडेजासंदर्भात मोठं वक्तव्य

IPL 2021 : महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सुरुवातीलाच मुंबई इंडियन्सशी (MI) भिडणार आहे. या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी रविंद्र जाडेजासंदर्भात (Ravindra Jadeja) मोठं वक्तव्य केले आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने रविंद्र जाडेजाला धोनी अगोदर बॅटिंगला पाठवायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

भारतात रंगलेल्या आयपीएल स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील स्पर्धेत रविंद्र जाडेजाने दमदार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले होते. वानखेडेच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात जाडेजाने एक षटकात 37 धावा कुटल्या होत्या. या सामन्यात जड्डूने हर्षल पटेलची धुलाई केली होती. आयपीएलच्या 14 व्या हंगामात पर्पल कॅपच्या शर्यतीत हर्षल पट्टले आघाडीवर आहे.

हेही वाचा: IPL 2021 : 400 सिक्सरचा विक्रम हिटमॅनच्या टप्प्यात !

मांजरेकरांनी दुसऱ्या टप्प्यातही चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी पहिल्या टप्प्याप्रमाणे समाधानकारक राहिल, असा अंदाज वर्तवला आहे. 2020 मध्ये आयपीएलच्या 13 व्या हंगामातील संपूर्ण स्पर्धा युएईत पार पडली होती. यावेळी चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील खराब कामगिरीची नोंद केली होती. यातून सावरत चेन्नईने पुन्हा जोमाने कमबॅक केले आहे.

मांजरेकर म्हणाले की, ‘चेन्नई सुपर किंग्जने बॅटिंग ऑर्डरमध्ये जाडेजाला बढती द्यावी असे वाटते. तो एम एस धोनीपूर्वीच खेळायला यायला हवा. जर सीएसकेनं या रणनितीने खेळली तर त्यांना फायदा होईल. ज्याप्रमाणे चेन्नईने मोईन अली सॅम कुरेनला तयार केले त्याचप्रमाणे आता जाडेजाचा वापरही संघाने केला पाहिजे.

हेही वाचा: IPL 2021 : गंभीरनं काढली CSK सह धोनीतील खोट

मांजरेकरांनी चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनवर भाष्य करताना जोश हेजलवुड आणि लुंगी एनिग्डी या दोघांना संघात स्थान मिळावे, अशी आशा व्यक्त केली. या दोन परदेशी खेळाडूंशिवाय मोईन अलीला संघात स्थान द्यावे. शक्य असेल तर इम्रान ताहिरला खेळवण्याचाही प्रयत्न करावा, असा सल्लाही त्यांनी चेन्नई सुपर किंग्जला दिलाय.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाला बढती देण्यात आली होती. यावेळी संजय मांजरेकर यांनी टीम इंडियाच्या निर्णयावर शंका व्यक्त केली होती. परदेशातील मैदानात भारतीय संघाने जाडेजावर गरजेपेक्षा अधिक विश्वास टाकला आहे. हा निर्णय आशियातील मैदानावर घेतला असता तर त्याचा फायदा झाला असता, असे ते म्हणाले होते.

Web Title: Ipl 2021 Ravindra Jadeja Should Bat Above Ms Dhoni For Chennai Super Kings In Ipl Says Sanjay Manjrekar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top