esakal | IPL 2021: 'प्ले ऑफ'च्या सामन्याआधी RCB च्या २ खेळाडूंनी सोडला संघ
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

RCB ने ट्विट करून दोघांना मुक्त केल्याचं सांगितलं

'प्ले ऑफ'च्या सामन्याआधी RCB च्या २ खेळाडूंनी सोडला संघ

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 च्या Qualifier 1 सामन्यात चेन्नईच्या संघाने दिल्लीला पराभूत केले. दिल्लीने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने शेवटच्या षटकात सामना जिंकला. विजयासह चेन्नईचा संघ फायनलमध्ये गेला. तर दिल्लीच्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. आज बंगळुरू विरूद्ध कोलकाता यांच्यात बाद फेरीचा सामना रंगणार आहे. या अतिमहत्त्वाच्या सामन्याआधी RCB च्या २ खेळाडूंनी संघ सोडल्याची घटना घडली.

हेही वाचा: T20 World Cup विजेता संघ होणार मालामाल; कोणाला किती रक्कम?

नक्की काय घडला प्रकार?

पंजाब संघाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने स्पर्धेच्या मध्यातच संघ सोडल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. टी२० विश्वचषक स्पर्धेआधी मानसिकदृष्ट्या फ्रेश होण्यासाठी त्याने तो निर्णय घेतला होता. त्यानंतर आता RCB चा आज प्ले ऑफचा सामना असताना दोन खेळाडूंना संघ सोडल्याची घटना घडली. श्रीलंकेचे वनिंदू हसरंगा आणि दुश्मंता चमिरा या दोघांनी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी RCBचा संघ सोडला. श्रीलंकेचा संघ T20 World Cup साठी थेट पात्र ठरलेला नाही. त्यामुळे त्यांना पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या संघाला त्यांच्या स्टार खेळाडूंची गरज असल्याने या दोघांनी RCB च्या संघाशी चर्चा केली आणि ते स्पर्धेबाहेर पडले.

हेही वाचा: 'ग्लॅमरस IPL' ... मॅचपेक्षाही 'या' तरूणींच्या अदांचीच चर्चा!

RCB संघाने या दोन खेळाडूंची समस्या समजून घेत त्यांना संघातून मुक्त केले. वनिंदू हसरंगा आणि दुश्मंता चमिरा यांना RCB च्या बायो बबलमधून मुक्त करण्यात येत आहे. या दोघांना विश्वचषकासाठी श्रीलंकेच्या संघात सामील व्हायचे आहे. श्रीलंकेचा संघ पात्रता फेरी खेळणार आहे. या दोघांना विश्वचषकासाठी शुभेच्छा, असं RCB व्यवस्थापनाने म्हटलं आहे.

loading image
go to top